Sharib Hashmi Love Life: 'द फॅमिली मॅन'मध्ये JK सिंगल लाईफनं त्रासला, पण खऱ्या आयुष्यातली लव्ह स्टोरी फिल्म स्टोरीपेक्षाही फिल्मी, कोण आहे शारिब हाशमीची अर्धांगिनी?
कोण आहे शारिब हाशमीच्या आयुष्याची अर्धांगिनी, जिने कठीण काळात त्याचा खंबीर आधार बनून साथ दिली? पाहुया ..

Sharib Hashmi Love Life: ‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये JK तलपडे हा सिंगल लाईफमुळे सतत वैतागलेला, लग्नासाठी धडपडणारा अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पडद्यावर JKचं एकाकी आयुष्य पाहून हसू येत असलं, तरी खऱ्या आयुष्यात मात्र या व्यक्तिरेखेमागचा अभिनेता शारिब हाशमी पूर्णपणे वेगळ्या जगात जगतो. कारण शारिबची रिअल लाईफ लव्ह स्टोरी ही कोणत्याही सिनेमी पटकथेला लाजवेल अशी आहे. कोण आहे शारिब हाशमीच्या आयुष्याची अर्धांगिनी, जिने कठीण काळात त्याचा खंबीर आधार बनून साथ दिली? पाहुया ..
30 वर्षांपासून आयुष्याची जोडीदार
मनोज बाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या शारिब हाशमीने आपल्या सहज अभिनयामुळे ओटीटीवर वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, अभिनयाच्या पलीकडे त्याचं खासगी आयुष्य फारसं चर्चेत नसतं. जवळपास 30 वर्षांपूर्वी शारिबने नसरीनसोबत विवाह केला आणि तेव्हापासून हे दोघं एकमेकांच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात सोबत आहेत.शारिब अनेकदा सार्वजनिकपणे सांगतो की, त्याच्या यशामागे सर्वात मोठं योगदान त्याच्या पत्नीचंच आहे. जेव्हा त्याने सुरक्षित नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकायचं ठरवलं, तेव्हा नसरीनने त्याला मोठा पाठिंबा दिला. त्या काळात आर्थिक अडचणी होत्या, संघर्ष होता, पण पत्नीची साथ कधीच कमी पडली नाही.
View this post on Instagram
4 वेळा कॅन्सरशी झुंज; कठीण काळात विकले दागिने
एका मुलाखतीत शारिबने भावुक होत सांगितलं होतं की, अभिनयासाठी नोकरी सोडल्यानंतर कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तेव्हा घर चालवण्यासाठी नसरीनने स्वतःची दागिने विकले होते. इतकंच नाही, तर नसरीनने आयुष्यात चार वेळा कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली आहे. ओरल कॅन्सरशी झुंज देताना शारिब प्रत्येक क्षणी तिच्यासोबत उभा राहिला. या संघर्षाने त्यांच्या नात्याला आणखी बळ दिलं.
रील लाइफमध्ये गोंधळलेला JK असो, पण रिअल लाइफमध्ये शारिब हाशमी एक आदर्श पती आणि मजबूत साथीदार आहे. संघर्षाच्या काळात दागिने विकण्यापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी चार वेळा लढा देण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर एकमेकांची साथ न सोडणारी ही जोडी आजही बॉलिवूडमधील सर्वात कमी बोलली जाणारी आहे .नुकतंच एका मुलाखतीत शारिबने या घटनांचा उल्लेख केल्यामुळे त्याची रिअल लाईफ लव्ह स्टोरी चर्चेत आली आहे.























