आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे; अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य
Sharad Ponkshe : आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे; अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य

Sharad Ponkshe : "आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे. आपण सगळ्यांनी व्हिडीओ पाहिले आहेत. ज्यांच्या घरातील लोकांना मारलं आहे त्यांनी सांगितलं की धर्म विचारलाय. पण जर कोण विचारला नाही असं कोण म्हणतं असतील तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ... पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे", असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केलं आहे. ते कोल्हापुरातील (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पोंक्षे म्हणाले, पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली आहे. आता पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची वेळ आली आहे. कोण कलाकार यावर बोलत नाहीत, याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. आता इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आली आहे. आता नकाशावरून सगळं संपवूनच टाकूया. मोदींवर माझा खूप विश्वास आहे ते सर्व करून दाखवतात जास्त बोलत नाहीत.
पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे. जे बांधव या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल असं पाऊल उचलले जाईल. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न निर्माण केले जातात असे काही नाही. हे केवळ दाखवलं जातं. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व आहे हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी हिंदुत्ववादी म्हणजेच पुरोगामी आहे.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वरील गीतांचा कार्यक्रम होत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यामध्ये भरतनाट्यम नृत्य देखील सादर केलं जाणार आहे. अंदमान यात्रा सुरूच आहे. त्याठिकाणी आम्ही तरुण मुलांना घेऊन जातो. त्या ठिकाणी असलेल्या जेलमध्ये तरुणांना लेक्चर देतो. तिथला अनुभव तरुणांना देतो, सावरकर त्याठिकाणी कसे राहिले असतील हे दाखवतो. प्रत्येक आमदाराला अंदमानला घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे तिथली परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल. तिथं जाऊन आल्यानंतर सावरकरांबद्दल जे बोललं जातं ते बोलणार नाहीत. राहुल गांधी जर अंदमानला येणार असतील तर मी त्यांना घेऊन जाईन. त्यांना खर्च परवडत नसेल तर मी त्यांचा खर्च करतो, असंही शरद पोंक्षे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'अप्सरा' अदांमध्ये अवतरताच चाहते म्हणाले, सूख म्हणजे तूच गं; सोनालीच्या मादक अदांनी लक्ष वेधले























