Shalva Kinjawadekar : 'सात जन्मांसाठी बांधली गं दोरी...!' शाल्व किंजवडेकर अडकला लग्नंबधनात, मंगळसूत्र घालताना पत्नीला अश्रू अनावर
Shalva Kinjawadekar Wedding : झी मराठीवरील मालिका 'शिवा' फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर लग्नबंधनात अडकला आहे.
Shalva Kinjawadekar Wedding : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'येऊ तशी कशी मी नांदायला' (Yeu Tashi Kashi me Nandayala) मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) हा घराघरांत पोहचला. या मालिकेतून शाल्वला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सध्या तो झी मराठीवरीलच शिवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. असं असतानाच शाल्वच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा सुरु आहे. कारण शाल्व नुकताच लग्नबंधनात अडकलाय. त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरसोबत शाल्वने नुकतील लग्नगाठ बांधली.
मागील अनेक दिवसांपासून शाल्वच्या लग्नाची चर्चा होती. तसेच त्यांच्या अनेक समारंभाचे फोटोही सोशल मीडियावरुन समोर येत होते. पण आता त्यांच्या लग्नाचेही फोटो समोर आले आहेत. शाल्व आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता. आता अखेरीस या दोघांनी लग्नगाठही बांधली आहे.
कलाकार मित्रांनी शेअर केले लग्नाचे फोटो
दरम्यान शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो त्यांच्या कलाकार मित्रांनीही शेअर केले आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचे फोटो शेअर करुन त्यांच्या मित्रांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. सध्या सोशल मीडियावर शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाच्या फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.
शाल्व आणि श्रेया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत त्यांचं नातं जगजाहीर केलं. नातं जगजाहीर केल्यानंतर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. श्रेया ही व्यवसायाने फॅनन डिझायनर आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram