सुपरफास्ट 100M Views, टॉप रँकिंग, रील्स आणि शॉर्ट्स वर धुमाकूळ, संजूच्या 'एक नंबर, तुझी कंबर'ने भले भले रेकॉर्ड मोडले!
Shaky Ek Number Tujhi Kambar Sanju Rathod song : सुपरफास्ट 100M Views, टॉप रँकिंग, रील्स आणि शॉर्ट्स वर धुमाकूळ, संजूच्या 'एक नंबर, तुझी कंबर'ने भले भले रेकॉर्ड मोडले!

Shaky Ek Number Tujhi Kambar Sanju Rathod song : लोकप्रिय गायक संजू राठोडच्या (Sanju Rathod) आवाजातील ‘एक नंबर, तुझी कंबर’ (Ek Number Tujhi Kambar) या गाण्याने अवघ्या काही महिन्यांत यूट्यूबवर सुपरफास्ट 100 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रील्स, शॉर्ट्स आणि इन्स्टाग्राम व्हिडीओवर हे गाणं गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेंडिगला आहे.
विशेष म्हणजे, केवळ तरुण पिढीच नव्हे तर दिग्गज कलाकार आणि सेलिब्रिटी देखील या गाण्यावर थिरकत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये काही मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या नावांचाही समावेश आहे. संजू राठोडच्या खास आवाजातील गायन, नेहमी प्रमाणे स्त्री नटत असल्याचे बोल त्याने या गाण्यामध्ये घेतले आहेत.
संजू राठोडच्या सध्या व्हायरल होत असलेल्या गाण्यात अभिनेत्री ईशा मालवीय (Isha Malviya) हिने डान्स केला आहे. संजू राठोडचं गाणं व्हायरल करण्यात ईशा मालवीयचीही तितकीच मेहनत असल्याचं पाहायला मिळतं.
संजू राठोडच्या गाजलेल्या गाण्याची यादी
काळी बिंदी (Kaali Bindi)
GulabiSadi ( गुलाबी साडी )
Nauvari (नऊवारी पाहिजे)
Bulletwali (बुलेट वाली)
Karmat Nahi (करमत नाही)
संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याला यूट्यूबवर 108 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. काळी बिंदी या गाण्याने देखील 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. संजूचं सर्वात यशस्वी गाणं म्हणजे गुलाबी साडी.. संजूने गायलेल्या गाण्यापैकी गुलाबी साडी या गाण्याने सर्वात जास्त व्ह्यू मिळवले. शिवाय हे गाणं अनेक महिने सोशल मीडियावर ट्रेडिंगला होतं. आजही अनेक लोक हे गाण ऐकताना पाहायला मिळातत. या गाण्याला 431 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















