Shahrukh Khan New Advertisement : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यापासून आणि त्याच्या चाहत्यांपासून बरेच दिवस अंतर ठेवले होते. मात्र, पुन्हा एकदा शाहरूख पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपट पठाणची (Pathan) पहिली झलक पाहायला मिळाली. त्याच वेळी, एका नवीन जाहिरातीमध्ये तो त्याची नवीन हेअरस्टाईल फ्लॉंट करताना दिसला. अलीकडेच शाहरुख खान दुबई टुरिझमला प्रमोट करताना दिसला. या जाहीरातीत शाहरूखची मुलगी सुहानाचीही झलक पाहायला मिळाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुहानादेखील टिव्ही जाहिरातीत दिसणार आहे. तर हा समज चुकीचा आहे. 

  


या जाहिरातीत सुहाना दिसत नसून फक्त तिचं नाव आणि तिचा आवाज ऐकू येणार आहे. या जाहिरातीत तुम्हाला दिसेल की शाहरुख खानच्या नंबरवर सुहानाचा कॉल येतो. आणि या दोघांमधंल संभाषण ऐकू येतं. या जाहिरातीत शाहरूख खान दुबईचं वैविध्य दाखवताना दिसतो.  शाहरूखने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही जाहिरात शेअर केली आहे. 


 






आर्यन खानने 'द लायन किंग' मधून ऑडिओच्या माध्यमातून डेब्यू केला होता. तर या जाहिरातीत पहिल्यांदाच सुहाना खानचा आवाज ऐकायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये ती कधी पदार्पण करणार याबद्दल अजूनतरी कोणतीच माहिती समोर आली नाही. शाहरुख खानचे चाहते त्याच्या पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha