Kiran Mane On Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड'  (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता अभिनेते किरण मानेंनी 'झुंड' सिनेमासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. 


किरण मानेंची फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस".


किरण मानेंची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करत किरण मानेंनी नागराज मंजुळे यांची एक कवितादेखील शेअर केली आहे. किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकल्यामुळे ते चर्चेत आले होते. 


झुंड सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर


Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha