Rishi Kapoor : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता लवकरच ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' (Sharmaji Namkeen) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


ऋषी कपूर यांनी या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले होते. पण त्यांचे निधन झाल्यानंतर चित्रपटाच्या राहिलेल्या भागाचे शूटिंग परेश रावल यांनी पूर्ण केले. या चित्रपटात परेश रावल आणि ऋषी कपूर हे दोन्ही कलाकार एकच भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट 31 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 






ऋषी कपूर, परेश रावल यांच्यासोबतच  जूही चावला, सोहेल नैय्यर,  तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha