Punjab Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या (10 मार्च) जाहीर होणार आहेत. या निकालाची सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे. कोणत्या राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकालापूर्वी सोमवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. काही जण एक्झिट पोलच्या आधारे तर काही उमेदवारांच्या स्वतःच्या अंदाजानुसार निवडून येण्याचे दावे करत आहेत. अशातच काहीजण तर निकालापूर्वीच थेट लाडूची ऑर्डर देत आहेत.  


पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एक्झिट पोलच्या निकालांबद्दल खूप उत्सुक आहेत. सोमवारी रात्री आलेल्या अनेक एक्झिट पोलने यूपीमध्ये भाजप आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला (आप) स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याचे एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहेत.




दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सीएनएन न्यूज 18, टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीवी आणि न्यूज एक्स या चॅनलने केलेल्या एक्झिट पोलच्या आधारे भाजप आणि मित्रपक्षाला 326 ते 211 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पार्टी आणि मित्रपक्षांना 160 ते 171 जागा मिळण्याची शक्यचा वर्तवली आहे. त्यामुळे युपीमध्ये सत्तेचा कौल पुन्हा भाजपच्या बाजूनचे जात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे. तर इंडिया टुडे, एक्सिस माई इंडियाच्या अंदाजानुसार भाजपला 288 ते 326 जागा मिळण्याची शक्यता सांगितली आहे.  तर समाजवादी पार्टीला 71 ते 101 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. काही पोलनुसार, 117 जागांपैकी 76 ते 90 जागा आम आदमी पार्टीला मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असेही सांगण्यात येत आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये आप पक्षाला जवळपास 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.


चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 100 ते 111 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाला दहा ते 17 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. अकाली दल-बीएसपी पक्षाला सहा ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला एक किंवा दोन जागा मिळू शकतात. तर अपक्ष एका जागेवर येण्याची शक्यता आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: