VIDEO : हलगीच्या ठेक्यावर अंग कापतंया थरथर, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मधील नव्या गाण्याची चर्चा
Vajiv Dada new song : हलगीच्या ठेक्यावर अंग कापतंया थरथर, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मधील नव्या गाण्याची चर्चा

Vajiv Dada new song : मराठी अभिनेता सूरज चव्हाण याच्या 'झापूक झुपूक' या सिनेमातील 'वाजीव दादा' हे नवं गाण दोन दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात सूरज चव्हाण आणि अभिनेत्री जुई भागवतसह बीग बॉसच्या मागील सिझनमधील अनेक कलाकारांनी या गाण्यात डान्स केला. या गाण्याचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलंय. सोशल मीडियावर रिलीज होताच या गाण्यावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
या गाण्यात सूरज चव्हाणचा अभिनय आणि त्याची उर्जित शैली पाहून प्रेक्षकांना दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची आठवण येत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये सूरजचा हटके अंदाज आणि त्याची एनर्जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे, पायल जाधव आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.
सूरज चव्हाणने सुरुवातीच्या सोशल मीडियावर रील बनवत त्याचे अभिनय कौशल्या दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला हळूहळू मोठ्या संधी मिळू लागल्या. त्याने 2024 मध्ये 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात विजेतेपद मिळवले. त्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून, तो बारामती तालुक्यातील मोडवे या लहान गावातून येतो. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याने अनेक अडचणींना तोंड दिले.
सूरजने आपल्या करिअरची सुरुवात मजुरीकामातून केली, जिथे तो दिवसाला 300 रुपये कमवायचा. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि लवकरच तो टिकटॉक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झाला. त्याच्या विनोदी आणि 'गोलिगत' शैलीतील व्हिडिओंनी त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली. सूरजच्या यशानंतर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. त्याच घर आता काहीच दिवसांत बांधून होणार आहे. अजित पवारांनी बांधकामाची पाहणी केली आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. सूरजने 'मुसंडी' (2023) आणि 'राजा राणी' (2024) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























