एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : '...त्यांना 'द ग्रेट शाहरुख खान' कसा झेपणार?' मराठी अभिनेत्याने शाहरुखच्या समाजकार्याचा पाढाच वाचला, दिल्या खास शुभेच्छा

Shah Rukh Khan : मराठी अभिनेत्याने शाहरुखच्या समाजकार्याविषयी अनेक गोष्टींचा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या साठीमध्ये प्रवेश केलाय. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 59व्या वाढदिवसानिमित्ताने त्याला जगभरातल्या त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्यात. यामध्ये कलाकार मंडळीही कुठे मागे राहिली नसल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीही शाहरुखला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. इतकच नव्हे तर त्यांनी शाहरुखच्या समाजकार्याचाही पाढा वाचलाय. 

'अन्नदान करतानासुद्धा धर्म बघून करणार्‍या त्या दळभद्र्या जमाती... त्यांना 'द ग्रेट शाहरूख खान' कसा झेपणार?' असं म्हणत त्यांनी शाहरुखच्या समाजकार्याचं कौतुक केलंय. त्यामुळे किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. 

किरण मानेंची पोस्ट

ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं...ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय ! 

आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वॉर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो ! 2012 साली त्यानं देशभरातली बारा खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनही तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय !

2008 साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह कॉन्सर्ट्स करुन तीस दशलक्ष रूपये जमा करुन दिले ! 2015 मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रूपये.. 2013 मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी तेहेतीस लाख रूपये.. त्याचप्रमाणे डॉ.मनमोहन सिंग यांच्या 'त्सुनामी रिलिफ फंड'साठी पंचवीस लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले !

एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा अपघात झाला...तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली.. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यंतचा सगळा रुग्णालयाचा खर्च त्याने उचलला... भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या 'मेक अ विश फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो ! 2009 मध्ये ओरीसामधल्या सात खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट सुरू केले.ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल 61 वर्षांनंतर त्या गांवांमध्ये 'लाईटस्' आले !

आयपीएल सिझन सातमध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षीस म्हणून पंधरा कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली !महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांसाठी त्यानं जगभर कॉन्सर्ट्स करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडियन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले !कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसीला दिलं. लॉकडाऊनमध्ये मुंबईत 1000 गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या 2000 लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवले.

शाहरुखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहीत जाईन पण तुम्ही वाचून वाचून थकून जाल. त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरुद्यात, कुणी म्हणेल पाकिस्तानला त्यानं ह्यॅव दिलं आणि त्यॅव दिलं. सगळ्या थापा आहेत हो. अहो, अन्नदान करतानासुद्धा धर्म बघून करणार्‍या त्या दळभद्र्या जमाती... त्यांना 'द ग्रेट शाहरूख खान' कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरुखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही !

त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या 20 व्या युनेस्को अवॉर्डस्मध्ये स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय.साऊथ कोरीयानं त्याला 'गुडविल ॲम्बॅसीडर' म्हणून सन्मानित केलंय.इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या 'लॉ युनिव्हर्सिटी'तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डॉक्टरेट देण्यात आलीय.तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर 'माणूस' म्हणून सुद्धा किंग आहे ! सलाम शाहरूख खान... कडकडीत सलाम !! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल.. आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा... 

ही बातमी वाचा : 

Amruta Khanvilkar : 'चला भेट झालीच आपली...', अमृता खानविलकरने शेअर केली आलिशान घराची पहिली झलक; ठेवलंय 'हे' खास नाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.