SBI Paid 19 Lakhs to Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा एक जुगाड अन् SBI कडून मिळतात दरमहा 19 लाख रुपये, कोणत्या स्किममध्ये गुंतवणूक केली?
SBI Paid 19 Lakhs to Abhishek Bachchan: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय देखील अभिषेक बच्चनला दरमहा सुमारे 19 लाख रुपये देते.

SBI Paid 19 Lakhs to Abhishek Bachchan: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अभिनेता असण्यासोबतच, एक उत्तम उद्योगपती (Businessman) आणि रिअल इस्टेट गुंतवणूकदार (Real Estate Investor) देखील आहे. अभिषेक बच्चननं आपल्या शहाणपणानं बिग बींच्या (Bigg B) मालमत्तेला नव्या उंचीवर नेलं आणि आता तो घरी बसल्याशिवाय लाखो कमावतो. अभिषेक बच्चनला दरवर्षी चांगली रक्कम मिळते.
SBI ला दरमहा मिळतात 19 लाख
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय देखील अभिषेक बच्चनला दरमहा सुमारे 19 लाख रुपये देते. अभिषेक हे उत्पन्न SBI च्या कोणत्याही स्किममध्ये गुंतवणूक करून मिळवत नाही, उलट त्यानं बँकेशी वेगळाच व्यवहार केलाय. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चननं मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्याचा, अम्मू अँड वत्सचा तळमजला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला भाड्यानं दिला आहे. त्याचंच भाडं म्हणून SBI दरमहा 19 लाख रुपये अभिषेकच्या खात्यावर वळते करते.
बच्चन कुटुंब आणि बँकेत लीज अॅग्रीमेंट
बच्चन कुटुंब आणि बँकेमधील ही लीज अॅग्रीमेंट 28 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आलेली आणि त्याचा कालावधी 15 वर्षांचा आहे. एसबीआयकडून अभिषेक बच्चनला दरमहा 18.9 लाख रुपये दिले जातात.
5 वर्षांनी भाडं वाढणार
दरम्यान, ज्युनियर बच्चनला संपूर्ण 15 वर्षांसाठी एसबीआयकडून फक्त 18.9 लाख रुपये भाडं मिळणार नाही. तर, करारात वेळोवेळी भाडं वाढवण्याची तरतूद देखील आहे. 5 वर्षांनंतर, हे भाडं 23.6 लाख रुपये आणि 10 वर्षांनंतर 29.5 लाख रुपये पर्यंत वाढू शकते. या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एसबीआयनं आधीच 2.26 कोटी रुपये ठेव रक्कम म्हणून दिलं होतं.
अभिषेक बच्चनचं नेटवर्थ
मीडिया रिपोर्टनुसार, एसबीआयनं भाड्यानं घेतलेली बच्चन कुटुंबाची मालमत्ता 3,150 स्क्वेअर फुटांची आहे. अभिषेक बच्चनच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, त्याची एकूण संपत्ती सुमारे 280 कोटी रुपये आहे. अभिषेक बच्चननं रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेककडे स्कायलार्क टॉवरमध्ये 5 बीएचके अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 41.14 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. काही काळापूर्वी त्यानं बोरिवलीमध्ये 15 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्यानं दुबईतील पॉश जुमेरिया भागात एक बंगला देखील बांधला आहे.
























