एक्स्प्लोर

Sayani Gupta: 'कट म्हटल्यावरही तो Kiss करत राहिला', इंटीमेट सीनवर या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, 'समोर 70 पुरुष होते आणि..'

अनेकदा इंटिमेट सीनमध्ये कलाकार सहअभिनेत्रींवर वर्चस्व गाजवतात अशा अनेक कथा समेार आल्या आहेत.

Sayani Gupta:ओटीटी विश्वात बॉलिवूडची सयानी गुप्ता अष्टपैलू आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयातून तिनं अनेक वैविध्यपूर्ण भूमिका आजवर साकारल्या आहेत. 4 मोअर शॉट्स प्लिज, इनसाईड एज,आर्टिकल १५  अशा दमदार कलाकृतींमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवलेल्या सयानीनं एक धक्कादायक खुलासा केलाय. एका इंटिमेट सीनच्या शुटींगदरम्यान, दिग्दर्शकानं 'कट'म्हटल्यानंतरही एका सहकलाकारानं चुंबन लांबवल्याचं सांगत तिला अस्वस्थ करणाऱ्या अनुभवाचा तिनं खुलासा केला.  मनोरंजनसृष्टीत घडलेल्या अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांवर अनेकजण कचरतात तर काही स्पष्टपणे बोलतात. अनेकदा इंटिमेट सीनमध्ये कलाकार सहअभिनेत्रींवर वर्चस्व गाजवतात अशा अनेक कथा समेार आल्या आहेत. कट म्हटल्यावरही अभिनेता सहअभिनेत्रीला कीस करत राहिल्याचेही अनेकदा ऐकायला मिळाले आहे. अशातच सयानीनं इंटीमेट सीन करताना तिच्यासौबत घडलेल्या एका प्रसंगाचा अनुभव शेअर केलाय.'जॉली एलएलबी 2', 'जब हॅरी मेट सेजल', 'आर्टिकल 15' आणि 'बार बार देखो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सयानी गुप्ताने नुकतेच रेडिओ नशाशी संवाद साधताना याविषयी सांगितले.

असुरक्षित वाटत होते..

एका सिनेमासाठी गोव्यात शुटिंग करत असताना सयानीसोबत घडलेल्या इंटिमेट सीनदरम्यान घडलेली घटना तिनं शेअर केली. ती म्हणाली, गोव्यात लहान ड्रेसमध्ये तिला समुद्रकिनारी वाळूत झोपायचे होते. तिच्यासमोर क्रू मेंबरसह जवळपास ७० लोक होते. यावेळी सयानीला खूप असुरक्षित वाटत होते असं ती सांगते. सेटवर तिच्याशेजारी एकही व्यक्ती नव्हता जो तिला शाल देऊ शकेल. कर्मचारीही नव्हते. सीन कापल्याबरोबर तिला जवळच्या कोणीतरी शाल देऊन मदत करावी अशी इच्छा असली तरी, अशी कोणतीही व्यवस्था सेटवर नव्हती. ती म्हणाली, "त्या दिवशी 800 एक्स्ट्रा आले होते, आणि मला असे वाटत होते की, 'मला फक्त एक व्यक्ती तिथे शाल आणून द्यावी.' असे बरेच वेळा होते कारण आम्ही इतक्या गर्दीत शूट करतो की कोणाचीही सुरक्षितता ही मनात शेवटची गोष्ट आहे."

कट म्हटल्यावरही कीस करत राहिला

काही लोकांना असं वाटतं की इंटीमेट सीन शुट करणं सोपं असतं कारण ते  तांत्रिक पद्धतीनं शूट केले जातात. याबद्दल सयानी सांगते, याचाच काही लोक फायदा घेतात. तिनं याचा सामना केल्याचंही तिनं सांगितलं. एकदा दिग्दर्शकानं कट म्हटल्यानंतरही तो ॲक्टर तिला कीस करत राहिल्याचं तिनं सांगितलं. हे अतिशय असभ्य आणि अयोग्य वर्तन असल्याचं ती सांगते. सयानीनं कोणाचंही नाव यात उघड केलं नसलं तरी ती सांगते, बरेच लोक या परिस्थितीचा फायदा घेतात.  अनेकदा कट म्हटल्यानंतरही ॲक्टर चुंबन लांबवतात. अनेकदा ते अगदी सटल असते पण ते केवळ असभ्य वर्तन आहे, असं सयानी सांगते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Embed widget