एक्स्प्लोर

Sayaji Shinde on NCP Merger: महाराष्ट्रासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं! सयाजी शिंदे सुनेत्रा वाहिनींसह मोठ्या साहेबांना भेटले, नेमकी काय चर्चा झाली?

Sayaji Shinde on NCP Merger: झालेल्या दुःखावर आपण काही बोलू शकत नाही सध्या. कोणीच काही बोलू शकत नाही." असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.

Sayaji Shinde On NCP Merger: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. अजित दादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय ही  पोकळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही जाणवत राहणार आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले आहेत. आज सुनेत्रा वाहिनी यांच्यासह मोठ्या साहेबांना भेटल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sayaji Shinde: काय म्हणाले सयाजी शिंदे?

"अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालाय.काहीतरी सुचावं यालादेखील वेळ जातोय. काही सुचत नाही. आज सुनित्रा वहिनींची भेट घेतली. काय बोलावं काही कळत नव्हत.त्यानंतर मोठ्या साहेबांचीसुधा भेट घेतली. मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. खरंतर अशी चर्चा झाली होती, निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे. आता फक्त औपचारिकता राहिलीय. हे होत असताना असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदा स्वभाव, निर्णय घेण्याचा स्वभाव पुन्हा महाराष्ट्रात यावा या दृष्टीने दादाचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं. झालेल्या दुःखावर आपण काही बोलू शकत नाही सध्या. कोणीच काही बोलू शकत नाही." असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.

शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी येत्या 12 तारखेला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. सुनील शेळके अजितदादांची पवार कुटुंब आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, असे म्हणाले. दादांच्या अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांनी जबाबदारीने पाऊल उचलले तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget