एक्स्प्लोर

Sayaji Shinde: साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? कुंभमेळ्यासाठीच्या वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदेंचा थेट सवाल

Sayaji Shinde: तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत.

मुंबई : नाशिकमधील कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी (Tree) आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले असतानाच आता पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल सयाजी शिंदेंनी (Sajayi shinde) विचारला आहे.   

तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही  तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल  प्रकरणी जाहीर निषेध करणार आहे. विशेष म्हणजे हा निषेध नोंदविण्या साठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबर ला सकाळी हा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत सजायी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. 

तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जात आहेत. त्यावरु, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून अभिनेता सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला. तसेच, ''साधू आले गेले काही फरक पडत नाही'' असेही त्यांनी म्हटले होते. त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत सजाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 10 वर्षांच्या आतली झाडं तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावायचीही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे, पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं, मूळात त्याचं उरलेलं वय किती आहे. त्यामुळे, झाडं तोडून दुसरीकडे कुठतरी 10 झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं हे आपली आई-बाप आहेत. आपण जगतो ते केवळ झाडांमुळे जगतो. आपल्या आई-बापांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहोत का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले.

झाडं तोडणं हे साधु-संतांना पटेल का? - शिंदे

कुठल्याही साधु संतांचा आपण कसा अपमान करू, मुळात झाडं तोडणं हे साधु संताना पटेल का? असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहा वर्षे झालेली झाडं मोडायची आणि त्या बदल्यात दुसरी 10 झाडं लावणं ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं महत्वाची आहेत आणि ती जगली पाहिजे हेही महत्वाचं आहे.

हेही वाचा

तपोवन वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का? नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटलं!

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget