एक्स्प्लोर

Savita Malpekar : तेव्हा अजित दादा म्हणाले, सरकारच्या तिजोरीतच खडखडाट आहे; कलाकारांच्या अल्प पेन्शनच्या मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Savita Malpekar : उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना अभिनेत्री सविता मालपेकर यांनी कलाकारांना मिळणाऱ्या अल्प पेन्शनचा मुद्दा मांडला होता.

Savita Malpekar :  ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) या सध्या अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक मुलाखतींमधून सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या अल्प पेन्शनचा मुद्द्यावर खुलासा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री असतानाचा हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. कलाकरांच्या ग्रेड काढून त्यांना सरसकट पेन्शन मंजूर करण्यात आली असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

अजित पवारांना जेव्हा हा पेन्शनचा मुद्दा सांगितला त्यावेळी, त्यांनी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगितलं. तरीही अजित पवारांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी कलाकारांच्या ग्रेड काढून सरसकट पेन्शनसाठी मंजूरी दिली. सविता मालपेकर यांनी नुकतीच 'इट्स मज्जा' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये हा किस्सा सांगितला आहे. 

'दादांकडे आम्ही भलीमोठी लिस्टच घेऊन गेलो'

सविता मालपेकर यांनी म्हटलं की, 'उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना, आम्ही काही मंडळी दादांना भेटायला गेलो. मी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलवर प्रदेश सरचिटणीस आहे. दादांकडे आम्ही भलीमोठी लिस्टच घेऊन गेलो होतो. आमच्याच नाट्य परिषदेचा एक पदाधिकारी त्याचा मला फोन आला. तो म्हणाला सविता मी जाऊन सांस्कृतिक मंत्र्‍यांना भेटून आलो, अमित देशमुख तेव्हा सांस्कृतिक मंत्री होते. ती व्यक्ती म्हणाली, मी पेन्शनचं त्यांना सांगून आलोय. तेव्हा ते म्हणाले मी दहा हजार रुपये देणार.. ए ग्रेड ला 10 हजार, बी ग्रेड ला एवढे. मी त्याला म्हटलं, ग्रेड ठरवणारा तू कोण? जर द्यायचे असतील तर सरसकट घ्या..' 

'दादा म्हणाले, सरकारी तिजोरीत खडखडाट आहे'

पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्यांच्या कॅटेगरीनुसार, ए ग्रेडवाल्यांना पेन्शनची काय गरज? सगळ्यात जास्त गरज ही बी आणि सी ग्रेडवाल्यांना असली पाहिजे.. जेव्हा आम्ही अजित दादांकडे गेलो तेव्हा त्यांना मी सांगितलं की, दादा ही ग्रेड आहे ती बंद करा.. ठरवणारे तुम्ही आम्ही कोण..?  1300 रुपये आणि 2700 रुपये? वृद्ध का म्हणतोय आपण? वृद्ध झाल्यावर जास्त गरज कशाची लागते, तर औषधपाण्याची.. मग आताच्या काळात ती औषधं चार दिवसांची पण येत नाहीत. जर द्यायचं झालं तर किमान महिनाभराची तरी औषधं येऊ दे त्यांना. किमान 20 हजार रुपये तरी द्या.. तेव्हा दादांनी सांगितलं की, खरंच आम्हाला लाज वाटते,की इतकी कमी पेन्शन.. पण तिजोरीत खडखडटात आहे.. मात्र मी नक्की प्रयत्न करेन..पण ह्याच्यापेक्षा नक्की जास्त देऊ.. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, तुमच्या परीने जेवढं होईन तेवढं करा.. पण सरसकट पेन्शन द्या..' 

ही बातमी वाचा : 

Suniel Shetty : समीर भुजबळांसाठी सुनील शेट्टी मैदानात, खास मित्रासाठी व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget