एक्स्प्लोर

Bebhan : संस्कृती बालगुडेची 'बेभान'मध्ये धमाकेदार एन्ट्री, 11 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज!

Bebhan : ‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून ‘बेभान’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एन्ट्री झाली आहे.

Bebhan : ‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून ‘बेभान’ (Bhebhan) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एन्ट्री झाली आहे. संस्कृती बालगुडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘बेभान’ प्रदर्शित होत आहे.

मधुकर (अण्णा) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे यांच्याच आगामी 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटाचीही चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by 𝑆𝑎𝑛𝑠𝑘𝑟𝑢𝑢𝑡𝑖 (@sanskruti_balgude_official)

साऊथच्या अभिनेत्याची मराठीत एन्ट्री

मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून, हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur). आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपण त्याचे काम पाहिले असून, अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमवले आहे.

‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट

दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या ‘बेभान’ या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुपसिंह मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंहनं बॉडीबिल्डिंगची ‘मिस्टर वर्ल्ड’ ही स्पर्धा जिंकली होती. अनुपसिंह ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

11 नोव्हेंबरला होणार रिलीज

चित्रपटाच्या पोस्टरवरून ‘बेभान’ हा रोमॅंटिक चित्रपट असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र, अभिनेता ठाकूर अनुपसिंह असल्यानं चित्रपटात धमाकेदार अॅक्शनही पहायला मिळेल का, याची उत्सुकता आहे. तसंच, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे या अभिनेत्री चित्रपटात असल्यानं ही प्रेमत्रिकोणाची गोष्ट आहे, की आणखी काही वेगळं पहायला मिळेल याची उत्तरं काहीच दिवसांत मिळतील. येत्या 11 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 10 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget