(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, तरिही निर्मात्यांची मोठी घोषणा
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारीत असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट 14 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठवाडा आणि राज्यातील इतर काही ठिकाणी चित्रपटाला प्रतिसद मिळत असल्याचा दावा चित्रपटाच्या टीमने केला आहे. मंगळवारी, छत्रपती संभाजीनगर येथे चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाचा 100 टक्के नफा मराठा समाजासाठी वापरण्यात येणार असल्याचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेत निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी म्हटले की, मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणी मधून आणि निर्मिती मधून राज्याच्या पुढे आणला. या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही. ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करत असल्याचा आनंद वाटत असल्याचे दोलताडे यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्रामधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा असे आवाहनही त्यांनी केले. ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही दोलताडे यांनी म्हटले.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असून अधिक शोची मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे यावा याकरिता चित्रपटाची निर्मिती झाली असल्याचे अभिनेता रोहन पाटीलने म्हटले.
संघर्षयोद्धाला आम्ही जरांगे सिनेमाचं आव्हान
येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संघर्षयोद्धा सिनेमासाठी थेट स्पर्धक बॉक्स ऑफिसवर येईल. त्यानंतरही संघर्षयोद्धाचा प्रवास खडतर होईल की सिनेमा वरचढ ठरेल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. दरम्यान संघर्षयोद्धा सिनेमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या देखील भूमिका आहेत.