एक्स्प्लोर

Sandeep Pathak : मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका, ‘राख' चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार!

 Sandeep Pathak : सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि'लुका हे दोन तगडे अभिनेते होते.

Sandeep Pathak : आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही (Sandeep Pathak) अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2022' (Couch Film Festival Spring 2022) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

नेदरलँड-अमेरिकेला मागे टाकत भारताने पटकावला पुरस्कार!

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि'लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपनं हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं. राजेश चव्हाण यांनी या मूकपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपनं साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' च्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या संदीपला मिळालेला हा पुरस्कार सर्वार्थानं त्यानं आजवर केलेल्या मेहनतीचं फळ आहे. एकीकडे विनोदी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना पोट धरून हसवताना संदीपनं दुसरीकडे धीरगंभीर भूमिका साकारत आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याचंही दर्शन घडवलं आहे. दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचं काम नेहमीच संदीपनं केलं आहे.

... हा आनंद खूप वेगळा!

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला की, हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. 'राख' च्या संपूर्ण टिमनं घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. ‘राख’मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असल्यानं यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच असल्याचंही संदीप म्हणाला.

संदीपनं 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'रंगा पतंगा', 'ईडक', 'एक हजाराची नोट' आदी 50हून अधिक चित्रपटांच्या जोडीला विविध नाटकांचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि पंचवीसपेक्षाही जास्त टीव्ही शोजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच संदीपचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात त्याची वेगवेगळी रुपं पहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget