एक्स्प्लोर

Sanam Teri Kasam Collection: 'सनम तेरी कसम' मोडणार री-रिलीजचे सारे रेकॉर्ड; 5 दिवसांत छप्पडफाड कमाई, 'इंटरस्‍टेलर'चे शोसुद्धा हाउसफुल!

Sanam Teri Kasam Collection: राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम'चं बजेट 25 कोटी रुपये आहे. 2016 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 9.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Sanam Teri Kasam Collection: हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि मावरा होकेन (Mawra Hocane) यांचा नऊ वर्षांपूर्वीचा चित्रपट 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) रि-रिलीज झाला. पण हा चित्रपट बॉलिवूडसाठी (Bollywood) एक सरप्राईज पॅकेज ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2016 मध्ये प्रचंड फ्लॉप झालेला हा चित्रपट या व्हॅलेंटाईन आठवड्यात खूप कमाई करत आहे, हे खरोखरंच आश्चर्यकारक आहे. मंगळवारी, पाचव्या दिवशी, चित्रपटाच्या कमाईत निश्चितच थोडी घट झाली, पण ही फक्त नाममात्र घट आहे. 2025 मध्ये बॉलिवूडला मिळालेलं पहिलं मोठं यश हे री-रिलीज झालेल्या चित्रपटामुळे मिळालेलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दुसरीकडे, ख्रिस्तोफर नोलनच्या 'इंटरस्टेलर'च्या (Interstellar) बाबतीतही असंच आहे. मर्यादित चित्रपटगृहांमध्ये फक्त 7 दिवस प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शो देखील जवळजवळ हाऊसफुल्ल होत आहेत.

राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम'चं बजेट 25 कोटी रुपये आहे. 2016 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 9.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. पण 9 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर, 5 दिवसांत या चित्रपटानं 21.75 कोटी रुपयांचं क्लासी कलेक्शन केलं. याआधी 'ये जवानी है दिवानी'नं पुन्हा प्रदर्शित झाल्यावर 26.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता 'सनम तेरी कसम' पहिल्याच आठवड्यात हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करत आहे.

'सनम तेरी कसम' बॉक्‍स ऑफिस कलेक्‍शन Day 5

Sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, 'सनम तेरी कसम'नं पहिल्या आठवड्यात 15.50 कोटी रुपयांचा विक्रमी कलेक्शन केलं. सोमवारी या चित्रपटानं 3.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर मंगळवारी या रोमँटिक ड्रामाच्या कमाईत -10 टक्के घट झाली. या चित्रपटानं पाचव्या दिवशी 3 कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला आहे. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 28-30 कोटी रुपयांचा गल्ला सहज जमवला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

'इंटरस्‍टेलर' री-रिलीज बॉक्‍स ऑफिस कलेक्‍शन Day 5

दुसरीकडे, क्रिस्टोफर नोलनची एपिक सायंटिफिक-फिक्शन एडव्हेंचर फिल्म 'इंटरस्टेलर'चा जलवाही आहेच. ही फिल्म फक्त 7 दिवसांसाठी लिमिटेड शोजसोबत री-रिलीज झाली आहे. मंगळवारी या फिल्मनंही 2.35 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. या पद्धतीनं 5 दिवसांत  'इंटरस्‍टेलर'नं एकूण 15.50 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. 

'छावा'ची 5.77 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग 

दोन्ही फिल्म्सकडे सध्या कमाई करण्यासाठी या आठवड्यातला केवळ बुधवार आणि गुरुवार आहे. शुक्रवारी विक्की कौशलचा बहुप्रतिक्षित 'छावा' रिलीज होणार आहे. ज्यानं मंगळवारी रात्रीपर्यंत 5.77 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. अशातच 'सनम तेरी कसम'ला आठव्या दिवशी बॉक्‍स ऑफिसवर ही फिल्म टक्कर देणार आहे. तसेच, यापूर्वीच रिलीज झालेले 'बैडएस रवि कुमार', 'लवयापा', 'स्‍काई फोर्स' आणि 'देवा'ही शर्यतीत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rinku Rajguru and Krishnaraaj Mahadik: 'आर्ची'च्या भाळी लागणार कृष्णराज महाडिकांच्या नावाचं कुंकू? रिंकू राजगुरुच्या सूचक स्टेटसची सर्वत्र चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Pakistan Army Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
Gold Rate : सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Solapur News : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
मोठी बातमी : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
Embed widget