Sameer Choughule Read His Own Death News: 'समीर चौघुले गेले, अशी बातमी आली अन्...', एकदा नाहीतर, दोनदा ऐकलेली स्वतःच्याच मृत्यूची बातमी; नेमकं काय घडलेलं?
Sameer Choughule Read His Own Death News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलें सांगितला स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्याचा किस्सा.

Sameer Choughule Read His Own Death News: मृत्यू हा जीवनाचा अंतिम टप्पा आहे, याला आपल्या सर्वांनाचा कधीना कधी सामोरं जायचंय, पण तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकजण त्याला घाबरतो. हा शब्दही नकोसा वाटतो. पण, जर तुम्ही तुमच्या जीवंतपणीच तुमच्या मृत्यूची बातमी ऐकलीत तर...? धक्का बसेल ना. त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल, याचं शब्दांत वर्णन करणंही कठीण आहे. पण, असंच एकदा नाहीतर, तब्बल दोनदा एका मराठी अभिनेत्यासोबत (Marathi Actor) झालंय. या अभिनेत्यानं तब्बल दोन वेळा स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकलेली आणि त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली. याबाबत अभिनेत्यानं स्वतः पॉडकास्टमध्ये बोलताना खुलासा केला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याबाबत (Actor) सांगत आहोत, तो अभिनेता म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम समीर चौघुले (Sameer Choughule). आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचं मनोरंजन करणारं व्यक्तीमत्व म्हणजे. समीर चौघुले. त्यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं. त्यांचा नुकताच आलेला 'गुलकंद' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातली त्यांची विनोदी शैली आणि सई ताम्हणकरसोबतची त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये समीर चौघुलेंनी हजेरी लावलेली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तब्बल दोनदा स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्याचा किस्सा सांगितला.
समीर चौघुले नेमकं काय म्हणाले?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते समीर चौघुले नुकतेच सोनी मराठीच्या MHJ unplugged या पॉडकास्टमध्ये उपस्थित होते. एका सकाळी चुकून कोणीतरी बातमी टाकली की समीर चौघुले गेले... नेमकं काय घडलं होतं?, असं विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना समीर चौघुलेंनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "हे एकदा नाही, दोनदा असं घडलंय. एकदा पण एक अशीच बातमी पसरलेली... विजय चौघुले नावाचे, पुण्यातले रंगकर्मी, त्यांचं निधन झालेलं. करोनामध्ये आपण 800 खिडक्या 900 दारं ही सीरियल करायचो... ती मालिका मी लिहायचो आणि त्यात कामही करायचो... तेव्हा आम्ही घरातून आपल्याच मोबाईलवर शूट करायचो... त्यामुळे मी शूट करत होतो आणि मोबाईल फ्लाइट मोडवर होता. ऑलरेडी आपल्या ग्रुपवर हे कोणीतरी टाकलेलं आणि सगळीकडे पसरलेलं..."
View this post on Instagram
"मला यातलं काहीच माहीत नव्हतं. हे मला पहिल्यांदा सई ताम्हणकरनं सांगितलं. ती मला फोन करत होती. फोनवर मला म्हणाली की, सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता... त्यानंतर तिनं मला सगळं सांगितलं. मग त्या माणसाला मी सांगितलं आणि मग त्यानं ती पोस्ट काढली. पण, एखादी गोष्ट आपण कन्फर्म न करता सगळ्यात आधी मला टाकायचं आहे, हा जो आग्रह असतो. याच्यावर नंतर आपण स्किटही केलं होतं...", असं समीर चौघुलेंनी सांगितलं.
पॉडकास्टमध्ये बोलताना मुलाखत घेणाऱ्या अमित फाळकेंनीही एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "छगन चौघुले नावाचे एक संगीतकार होते त्यांचं करोनामध्ये निधन झालं होतं. सोनी मराठीच्या कार्यक्रमातही त्यांनी परफॉर्म केलं होतं. कोणीतरी त्यांच्या निधनानंतर छगन चौघुले यांना आदरांजली द्यायच्या ऐवजी समीर चौघुलेंचा फोटो वापरुन पोस्ट केली..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























