एक्स्प्लोर

Samay Raina: 'अभी ज़िंदा हूँ '; पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत, काय काय घडलं सगळंच सांगितलं, समय रैनाच्या नव्या व्हिडीओने पुन्हा धुमाकूळ

Samay Raina Reveals Comeback After Youtube Controversy: 'इंडियाज गॉट लेटंट' या शोमुळे वादात सापडलेल्या समय रैनाने 14 महिन्यांनंतर पुन्हा कमबॅक केला आहे.

Samay Raina Still Alive Full Video Controversy Explanation: गेल्या वर्षी कॉमेडियन समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट' (Indias Got Latent) या शोमुळे प्रचंड चर्चेत आला होता.  या शोमध्ये स्पर्धक येतात आणि आपली कॉमेडी (Comedian) सादर करतात. समय रैनासोबत (Samay Raina) उपस्थित असलेलं पॅनल देखील स्पर्धक आणि उपस्थितांना रोस्ट करतात. परंतु, या शोमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा जास्त वापर होतो. एका एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. समय रैनासह त्याच्या शोवरही प्रचंड टीका करण्यात आली. यामुळे समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटंट' बंद पडलं. यूट्यूबर्स  आणि कॉमेडियन्सना कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या. या प्रकरणामुळे प्रचंड गदारोळ झाला. यूट्यूबर  रणवीर अलाहाबादियानेही माफी मागितली. या वादानंतर  चौदा महिन्यांनंतर समय रैना यूट्यूबवर परतला आहे. त्यानं यूट्यूब व्हिडीओतून जबरदस्त कमबॅक केला आहे.  या व्हिडीओत त्यानं 14 महिन्यांत नेमकं काय काय घडलं? याबद्दल सांगितलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. 

'समय रैना - स्टील अलाइव्ह' (Samay Raina New Show Still Alive)

समय रैनाने  'समय रैना - स्टील अलाइव्ह'  या शोद्वारे पुनरागमन केलं आहे.  त्यानं  1 तास 21 मिनिटांच्या कमबॅक व्हिडीओमध्ये आपल्या शोभोवतीच्या वादावर मौन सोडले आहे. IGL या शोमध्ये विचारण्यात आलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावर समय रैना म्हणतो, 'रणवीर अलाहाबादियाने संपूर्ण शोमध्ये  तो वादग्रस्त प्रश्न किमान आठ वेळा विचारला होता.  बरंच काही बोलला होता, एडिटमध्ये त्या गोष्टी काढून टाकल्या.  मात्र, फायनल एडिटमध्ये  तेवढा एकच प्रश्न समाविष्ट केला होता', असं समय म्हणाला.  मुंबई पोलिसांनी 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधील एपिसोड्स पाहून अॅक्शन घेतली. मुंबई पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली? याबाबतही त्यानं आपल्या व्हिडीओत सांगितलं. 

14 महिन्यांनंतर समय रैनाचा धमाकेदार कमबॅक (Samay Raina Comeback Through New Show)

कमबॅक व्हिडीओमध्ये,  समय रैनाने या वादातून वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या परिणामांबद्दलही सांगितलं.  'वादामुळे मला एक वर्ष कॉमेडीपासून दूर राहावं लागलं. या संपूर्ण वादाचा कामावर थेट परिणाम झाला',  असं समयनं सांगितलं. यासह रणवीरच्या एका चुकीच्या प्रश्नामुळे, शोमधील संबंधित प्रत्येक व्यक्तीचे कसे नुकसान झाले,  याबाबतही त्यानं सांगितलं. सुनील पाल, मुकेश खन्ना   यांसारखे दिग्गज लोक आणि राजकीय नेते त्याच्या शोवर कसे तुटून पडले होते, याबद्दलही  खुलासा समयने आपल्या व्हिडीओत केला.  दिग्गज लोकांनी या शोवर टीका केली होती, असंही त्यानं सांगितलं. 

 सुनील पालच्या टीकेला उत्तर देताना समय म्हणाला, 'सुनील पालने कपिल शर्माकडून कॉमेडी शिकण्याचा सल्ला दिला होता. पण, कपिल शर्माने स्वत: मेसेज करुन या शोचं कौतुक केलं होतं', असा खुलासा समय रैनाने केला.  कपिल शर्माला 'इंडियाज गॉट लेटंट' हा शो प्रचंड आवडला होता, असं समय म्हणाला.

'इंडियाज गॉट लेटंट' मधील प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं (Indias Got Latent Controversy Case)

फेब्रुवारी 2025 मध्ये , 'इंडियाज गॉट लेटंट' हा यूट्यूब शो एका मोठ्या वादात सापडला होता. एका एपिसोडमधील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन, या शोवर अनेक राज्यांमधून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या . हे प्रकरण इतकं वाढलं की,  राष्ट्रीय महिला आयोगाने  समन्स पाठवले, तसेच  महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीला सुरुवात केली.  हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोगर; वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget