Samay Raina Luxury Car: समय रैनाची दिवाळी दणक्यात; स्वतःला गिफ्ट केली आलिशान कार, किंमत अन् फिचर्स तर बापरे बाप!
Samay Raina Luxury Car: समय रैनानं आपल्या आलिशान गाडीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 18 ऑक्टोबर 2025 रोजी समय रैनानं त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केले आहेत.

Samay Raina Luxury Car: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना (Samay Raina) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण, यावेळी कारण त्याचा कोणताही शो नाही किंवा, वादग्रस्त वक्तव्यही नाही. तर, यावेळी कारण आहे, समय रैनाच्या घरी आलेल्या महागड्या कारचं (Samay Raina Buy Luxury Car). धनत्रयोदशीच्या निमित्तानं, समय रैनानं स्वतःलाच एक आलिशान गिफ्ट दिलं आहे. समय रैनानं टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) गाडी खरेदी केली आहे.
समय रैनानं आपल्या आलिशान गाडीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 18 ऑक्टोबर 2025 रोजी समय रैनानं त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो त्याच्या नव्या गाडीजवळ उभा असल्याचं दिसतंय, यावेळी त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही दिसत आहेत. समयची नवीकोरी कार फुलांनी सजवण्यात आली होती. एका व्हिडीओमध्ये समयनं कारच्या आतमधला व्हिडीओही शेअर केलाय. त्यासोबत त्यानं लिहिलंय की, "You guys were right". त्यानंतर समयनं आपल्या घरातले काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये त्याचं संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचं पाहायला मिळालं.

समय रैनानं घेतलेली कार साधीसुधी नाही बरं, तिची किंमत तर मोठी आहेच, पण त्यामध्ये धमाकेदार फिचर्सही आहेत. टोयोटा वेलफायरचा आलिशान आणि लग्झरी कार्समध्ये होतो. या कारमध्ये आरामात 7 जण बसू शकतात. सीट अॅडजस्टमेंट, हीटिंग, मसाज आणि डेडिकेटेड फूटरेस्ट सारखे अनेक खास फिचर्स यात आहेत. भारतात या कारची किंमत 1.2 कोटी ते 1.3 कोटी दरम्यान आहे. आमिर खान, अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि अजय देवगणसह अनेक मोठ्या स्टार्सच्या कार कलेक्शनमध्ये ही कार आहे.

समय रैनाच्या यूट्यूब शोविरोधात झालेला गुन्हा दाखल
समय रैनाच्या यंदाच्या वर्षाची सुरुवात काहीशा डोकेदुखीनं झाली. 2025 सुरू होताच, समय रैनाचा यूट्यूब शो India's Got Latent वादाच्या भोवऱ्यात आलेला. फेब्रुवारीमध्ये आलेल्या एका एपिसोडमध्ये समय रैनाच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला त्याच्या आई-वडिलांबाबत एक आक्षेपार्ह्य प्रश्न विचारला. ज्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर समय रैनासह इतर काही यूट्यूबर्स विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला.

दरम्यान, India's Got Latent वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर समय रैना काही काळ कुठेच दिसला नाही. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा नवी सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत तो पॉडकास्ट शोच्या निमित्तानं काही जाहीराती करताना दिसला. अशातच आता समय रैनानं स्वतःला एक आलिशान कार गिफ्ट केली आहे.
























