Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Salman Khan Meets Brother Sohail Khan: सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, प्रोमो सोशल मीडियात व्हायरल.

Salman Khan on 'Alliance': अभिनेता सलमान खान (Salman Khan) कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचे अलिकडचे फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंवरुन सलमान खानला काहींनी प्रचंड ट्रोल केलं. आता सलमानने 'अलायन्स'मध्ये (Alliance) हजेरी लावली. या शोचा प्रोमो आणि व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये सलमान खान भाऊ सोहेल खानला (Sohail Khan) भेटतो. यावेळी इतर स्पर्धक शॉक (Entertainment) होतात. त्याने या शोमध्ये रितेश देशमुखच्या नावाचाही उल्लेख केला. सलमान भाईजान 'अलायन्स'मध्ये आल्यानंतर नेमकं काय घडतं? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री (Salman Khans Grand Entry in Alliance Reality Show)
सोशल मीडियावर सध्या 'अलायन्स'चा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, सलमान खानची हटके स्टाइलमध्ये एन्ट्री होते. सलमान खानला पाहताच इतर स्पर्धक आश्चर्यचकित होतात. भाऊ सोहेल खानला भेटण्यासाठी सलमान खान 'अलायन्स' मध्ये गेला असल्याची चर्चा आहे. सलमान खान सोहेल खानची विचारपूस करतो. यावेळी सोहेल भाऊ सलमान खानसमोर आपल्या भावना व्यक्त करतो.
View this post on Instagram
सलमान खान सोहेल खानला मिठी मारतो. सलमान खान स्पर्धकांना 'तुम्ही सोहेलला जास्त स्ट्रेस तर देत नाहीत ना?', असा प्रश्न इतर स्पर्धकांसमोर उपस्थित करतो. इतर स्पर्धक 'बिलकूल नाही', असं म्हणतात. यानंतर सलमान खान, 'मला असं वाटतंय, रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे...', असं म्हणत सलमान खान हसतो. सलमान खान नेमकं असं का म्हणाला? कोणत्या संदर्भात म्हणाला? असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान, सलमान खान मस्करीत बोलत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. दरम्यान, रितेश देशमुखबाबत सलमान खान नेमकं असं का म्हणाला? हे एपिसोड बघितल्यानंतरच उघड होईल. दरम्यान, सलमान खानच्या एन्ट्रीचा हा एपिसोड नेमकं कधी रिलीज होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या सलमान खानचा 'अलायन्स' शोमध्ये एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















