एक्स्प्लोर

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

Salman Khan On CJP Students Protest: दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक संघर्ष होऊन एक दिवस उलटल्यानंतर, अनेक अभिनेते आणि गायकांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून सरकारलाही चर्चा करण्याचं, संवाद साधण्याचं आवाहन केलंय.

Salman Khan On CJP Students Protest: राजधानी दिल्लीत (Delhi) सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं (Student Protest) आता देशाच्या विविध भागांत पसरली आहेत. केवळ दिल्लीतच नव्हे, तर अनेक शहरांमधील विद्यार्थी निदर्शनं करत आहेत आणि रॅलींचे आयोजन करत आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janata Party) आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि निदर्शकांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक संघर्ष होऊन एक दिवस उलटल्यानंतर, अनेक अभिनेते आणि गायकांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून सरकारलाही चर्चा करण्याचं, संवाद साधण्याचं आवाहन केलंय.

दरम्यान, सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांसारख्या बड्या बॉलिवूड (Bollywood News) स्टार्सच्या मौनाबाबत बरीच चर्चा रंगली होती. अगदी कपूर कुटुंबीयांनीही (Kapoor Family) यावर पूर्णपणे मौन बाळगलंय. मात्र, अखेरीस बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान यानं एक निवेदन जारी केलंय. सलमान खाननं एक ट्वीट (Salman Khan Tweet) करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा जाहीर केलाय.   

सलमान खान नेमकं काय म्हणाला? (Salman Khan On Student Protest)

सलमान खान ट्वीट करत म्हणाला की, "ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागले याचे खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणे (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे."

हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत : सलमान खान (Salman Khan Tweet On Student Protest)

"त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचे भविष्य घडवण्याची तसेच एक महान आणि सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती समर्पित आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल...", असं सलमान खान म्हणाला.

याचं राजकारण केलं जाऊ नये... : सलमान खान (Actor Salman Khan Reaction On Delhi Protest)

पुढे बोलताना सलमान खान म्हणाला की, "हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये. याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की, सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो..." 

शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे : सलमान खान 

"शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक 'एज्युकेशनल हब' (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल...", असं सलमान खान म्हणालाय. 

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठींबा मिळतोय. राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी मैदानात उतरले आहेत. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज,अतुल कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचलेले. तर, नसरुद्दीन शाह, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टमधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता. तर, यावर बॉलिवूडच्या तीन खान्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. तर कपूर कुटुंबीयांकडूनही या प्रकरणात मौन बाळगलेलं. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. अशातच आता बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खाननं यावर आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच, आता नेटकऱ्यांकडून शाहरुख खानंही आपली भूमिका जाहीर करावी असा सूर आवळला जातोय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget