एक्स्प्लोर

सलमान भडकला, म्हणाला काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय

कोरोना लॉकडाऊनमध्ये काही लोक अजूनही घराबाहेर पडून स्वत:चा आणि सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर अभिनेता सलमान खान चांगलाच भडकला आहे.

मुंबई : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही काही लोक अजूनही घराबाहेर पडून स्वत:चा आणि सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर अभिनेता सलमान खान चांगलाच भडकला आहे. सलमानने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांना लोकांना समज दिली असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओत सलमान म्हणतोय की, कोरोनाच्या या महामारीत डॉक्टर व नर्सेस तुमचे प्राण वाचवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करताय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळून जात आहेत. कोणत्या दिशेला पळताय तुम्ही? मृत्यूकडे की जीवनाकडे? जर हे डॉक्टर तुमचा उपचार करत नसते आणि पोलीस रस्त्यांवर सुरक्षेसाठी नसते तर काही लोक ज्यांना असं वाटतं की आम्हाला कोरोना होणार नाही ते देशाच्या अनेक लोकांसोबत आपलेही प्राण गमावून बसतील, असं सलमानने म्हटलं आहे. सलमान म्हणाला की, ज्यांच्याकडे दोन वेळचं पोट भरायला जेवण नाहीये, मुलांचं पोट भरण्यासाठी अन्न नाही, त्यांना मी सलाम करतो. कारण त्यांनाही हे ठाऊक आहे की कुटुंबीयांना गमावण्यापेक्षा ही वेळ निघून जाणं योग्य आहे. देशात खूप चांगलं काम होतंय. देशाचे नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय. तुम्ही नीट वागला असता तर आतापर्यंत आपण सर्वजण पुन्हा कामावर रुजू झालो असतो. चीनमधून सुरू झालेला कोरोना आता तिथे नियंत्रणातसुद्धा आला आहे. मात्र आपल्याकडे काही लोकांमुळे संपूर्ण देशवासियांना घरात बसावं लागत आहे, असं सलमान या व्हिडीओत म्हणाला. तुम्ही खूप ताकदवान आहात हे मानतो. पण तुम्ही इतके साहसी व ताकदवान आहात की तुमच्या कुटुंबीयांच्या मृतदेहाला खांदा देऊ शकाल? इतकी हिंमत आहे का? प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. याच्याही दोन बाजू आहेत. एकतर सर्वजण राहतील किंवा मग कोणीच नाही राहणार. आता तुम्ही ठरवा,  असंही तो म्हणाला. काय म्हणाला सलमान
View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget