Shubhangi Gokhale : तुझ्याशिवाय काहीच नाही, शुभांगी गोखलेंच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या लेकीची खास पोस्ट
Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लेक सखी गोखले हिने खास पोस्ट केली आहे.
Shubhangi Gokhale : प्रत्येक भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. नुकत्याच त्या 'घरत गणपती' (Gharat Ganpati) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. मालिका, सिनेमे, नाटक अशा तिन्ही माध्यमातून शुभांगी गोखले यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्या सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रिय आहेत. नुकताच शुभांगी गोखले यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची लाडकी लेक आणि अभिनेत्री सखी गोखलेने (Sakhi Gokhale) खास पोस्ट केली आहे.
सखीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही देखील कमेंट्स करत शुभांगी गोखले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सखीने तिचे वडील आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्यासोबतचेही क्षण यावेळी शेअर केले आहेत. तसेच शुभांगी गोखलेंसोबतचे बरेच फोटो शेअर करुन त्यावर दिलेल्या कॅप्शनने विशेष लक्ष वेधून घेतलंय. सखी ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली असल्याचं पाहायला मिळतंय.
सखीने आईला वाढदिवसासाठी दिल्या खास शुभेच्छा
सखीने आईसोबतचे बरेच खास क्षण शेअर करत म्हटलं की, 'वाईट दिवसांममध्येही आनंद मिळवणारी मुलगी म्हणून जी सगळ्यांच्या लक्षात राहते अशा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..आय लव्ह यू..! तू या जगात आल्याबद्दल आणि नंतर माझी आई झाल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद...तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नाही...' सखीच्या या पोस्टवर अमेय वाघ, सुखदा खांडकेकर या कलकारांनी कमेंट्स करत शुभांगी गोखले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवगंत ज्येष्ठ अभिनेते मोहन गोखले यांनी त्यांची मुलगी सखी ही अगदी सहा वर्षांची असतानाच या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सखीचा एकट्याने सांभाळ केला. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून सखी घराघरात पोहचली. त्यानंतर अमर फोटो स्टुडिओ यांसारख्या नाटकांमधून सखीने रंगभूमीवरही तिची छाप पाडली. अनेकदा सखी तिच्या सोशल मीडियावरुन तर कधी मुलाखतींमधून वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करत असते.
View this post on Instagram