Abhishek Bachchan : आराध्यानंतर बच्चन कुटुंबात पुन्हा पाळणा हलणार? रितेश देशमुखचा प्रश्न अभिषेकचं उत्तर, म्हणाला, 'पुढची पिढी...'
Abhishek Bachchan : दुसऱ्यांदा आईबाबा होणार का या प्रश्नावर अभिषेकच्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Abhishek Bachchan On Second Baby With Aishwarya Rai: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात फार काही अलबेल नसल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. 'दासवी' फेम अभिनेत्री निम्रत कौरमुळे या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचंही म्हटलं जात होतं. या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यातच नुकत्याच एका पार्टीमधले ऐश्वर्या आणि अभिषेकचे फोटोही समोर आले होते. आता रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) कार्यक्रमात अभिषेकने दुसऱ्यांदा आईबाबा होणार का? यावर भाष्य केलं आहे.
अभिषेक बच्चनने नुकतीच रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान, रितेशने 'अ'अक्षरापासून सुरू होणारी नावे निवडण्याच्या बच्चन कुटुंबियांच्या परंपरेविषयी भाष्य केलं आहे. रितेश अभिषेकला म्हणाला, "अमिताभ जी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक." या सर्वांची सुरुवात 'अ' अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांनी काय केले?..." यावर अभिषेक बच्चन म्हणाला, "आम्हाला हे त्यांना विचारावे लागेल. पण कदाचित ती आमच्या कुटुंबात एक परंपरा बनली आहे. अभिषेक, आराध्या..."
त्या प्रश्नावर अभिषेकचं उत्तर
रितेश पुढे अभिषेकला अडवत म्हणाला की, "आराध्यानंतर?" अभिषेकने उत्तर दिले, "नाही, पुढची पिढी आल्यावर बघू." रितेश म्हणाला, “कोण एवढी वाट पाहत आहे? जसे रितेश, रियान, राहिल (त्याची दोन मुले). अभिषेक, आराध्या..." या प्रश्नावर अभिषेक काहीसा लाजल्यासारखं दिसला. त्यावर तो रितेशला म्हणला की, "वयाचा विचार कर, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.'' यानंतर रितेश आणि अभिषेक दोघेही हसले आणि रितेशने अभिषेकला नमस्कार केला.
ऐश्वर्या-अभिषेकने 2011 आराध्याला जन्म दिला
एप्रिल 2007 मध्ये लग्न झालेल्या ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले. अलीकडेच या जोडप्याने त्यांच्या लाडक्या लेकीचा 13 वा वाढदिवस साजरा केला.
View this post on Instagram