एक्स्प्लोर

Sairat Fame Actor Wedding: 'सैराट' मधील सल्या लागला संसाराला; गर्लफ्रेंडशीच केला निकाह; फोटो पाहून आर्चीची कमेंट 

त्याने नुकतेच त्याच्या पत्नीसोबत निकाहाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. त्याच्या पोस्टखाली रिंकू राजगुरुनेही प्रतिक्रिया दिलीये.

Sairat film actor wedding: 'सैराट ' चित्रपट होऊन आता 10 वर्षे झाली तरी या चित्रपटातील स्टारकास्ट प्रेक्षकांच्या जशीच्या तशी लक्षात आहे. आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या या चौघांच्याही भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या . आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतेच. आता सैराट चित्रपटात 'सल्या ' ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेखने लग्न केले आहे. त्याने नुकतेच त्याच्या पत्नीसोबत निकाहाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. त्याच्या पोस्टखाली रिंकू राजगुरुनेही प्रतिक्रिया दिलीये.

'सैराट'मधील सल्याचं झालं लग्न ;  बायको कोण?

सैराट चित्रपटात ' सल्या ' ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याने त्याच्या गर्लफ्रेंडशी म्हणजेच सिमरनशी निकाह केला आहे.  त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही पारंपारिक वेशात दिसतायत. अरबाजने क्रीम कलरची शेरवानी घातली आहे. तर त्याची बायको सिमरनने तशाच रंगाची साडी नेसली आहे. त्याने या पोस्ट खाली ' जस्ट अस ' असं म्हटलंय. यावर अनेक कलाकारांनी व मनोरंजन सृष्टीतील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arbaj Shaikh (@arbajshaikh15)

लग्न झाल्याचं कळताच त्याच्या पोस्ट खाली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने हार्ट इमोजी टाकत दोघांना शुभेच्छा दिल्याचे दिसतंय. रिंकू आणि अरबाजने सैराट या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नंतर अरबाज मटका किंग या वेब सिरीजमध्ये झळकला. शिवाय पिक्चर बॉईज या चित्रपटातही त्याची भूमिका आहे.चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अरबाज आणि सिमरन गेल्या 3-4 वर्षांपासून एकमेकांसोबत होते. अखेर त्यांनी निकाह करून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

अभिनयासोबत स्वतःचा व्यवसायही

‘सैराट’नंतर अरबाजने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने विविध छटा असलेल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. केवळ चित्रपटांपुरताच मर्यादित न राहता, प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मटका किंग’ या विजय वर्माच्या मालिकेतही तो दिसला. अभिनयासोबतच अरबाजने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ त्याने ‘बेक बडीज’ नावाचं केक आणि कॅफे सुरू केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget