एक्स्प्लोर

Arbaz Shaikh Sairaat: 'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'

Sairaat fame Arbaz Shaikh: अरबाज शेखनं 'सैराट' सिनेमापर्यंतचा प्रवास कसा होता? याबद्दल सांगितले.

Arbaz Shaikh On Sairaat: 'सैराट' (Sairaat) या सिनेमानं केवळ महाराष्ट्रात नाही तर, सातासमुद्रापार आपला डंका गाजवला. या सिनेमातील प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात रिंकू राजगुरू,  आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख (Arbaz Shaikh) या कलाकारांना विशेष ओळख मिळाली. अरबाज शेख यानं 'सैराट' या सिनेमात 'सल्या'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. अलिकडेच अरबाजच्या लग्नातील खास फोटोस सोशल मीडियात व्हायरल झाले होते.   'सैराट' फेम अरबाज सिनेसृष्टीत नेमकं काय करायचा?  हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच त्याच्या चाहत्यांनाही आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत त्यानं 'सैराट' सिनेमा करण्यापूर्वीचा एक किस्सा शेअर केला.

'सैराट' सिनेमापूर्वी अरबाज शेख नेमकं काय करायचा? (Arbaz Shaikh open Up About Struggle)

अरबाज शेखनं अलिकडेच राजश्री मराठीला मुलाखत  दिली होती. या मुलाखतीत त्यानं 'सैराट' सिनेमा करण्यापूर्वीचा किस्सा शेअर केला.  'आमच्या गावात पहिले नागराज मंजुळे यांची मिरवणूक निघायची.  मला असं वाटायचं की, त्या मिरवणूकीत मी पण हवा.  कारण नागराज मंजुळे यांची मिरवणूक खूप भारी असायची. संपूर्ण गाव त्यांचं स्वागत करायचं. सगळे खूप आनंदात असायचे. 'फॅन्ड्री' सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळेस जेव्हा गावात मिरवणूक निघाली तेव्हा, त्या मिरवणूकीत नाचायला मी देखील होतो'.

'माझी तेव्हा अशी इच्छा होती की, नागराज सरांसोबत मी पण त्या गाडीत उभा पाहिजे. मला तिथपर्यंत पोहचायचं आहे, असं मी ठरवलं होतं. त्या गोष्टीच्या मागे लागत लागत मी आज इथपर्यंत पोहोचलो. मी ऑडिशन्स दिले. आता मागे वळून पाहिलं तर, असं वाटलं नव्हतं कधी मी एवढं काम  करेन, इतक्या गोष्टी घडतील आपल्यासोबत... पण आता छान वाटतंय. जे काम मिळतंय, ते मी करतोय. मी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही, प्रत्येक कामाला स्वीकारत आहे.  या सिनेमामुळे आमच्या आयुष्यात एक वेगळाच प्रवास सुरु झाला.  सुरुवातीला असं वाटलं नव्हतं, सैराट इतक्या कोटींचं कलेक्शन करेल, एवढे लोक आम्हाला ओळखतील'.

'सिनेमा नेमका काय असतो, फिल्मची प्रोसेस कशी असते? हे आम्ही 3 महिन्यांत शिकलो. आता जे आम्ही 3 महिन्यांत शिकलो, ते आम्हाला आता कळतंय', असं अरबाज म्हणाला.  सिनेइंडस्ट्रीतील 10 वर्षांचा प्रवास नेमका कसा होता?  या प्रश्नावर अरबाज म्हणतो, 'आयुष्यात चढ उतार असावेत. कारण आपल्याला ज्या गोष्टी मिळतील, त्यात आपल्याला आनंद मिळणार नाही. 'सैराट' हा सिनेमा प्रचंड हिट झाला. आम्ही 3 वर्ष काम केलं नाही.  काम न करण्यासाठी काही कारणं देखील आहेत. आता  हळूहळू काम करतोय, खूप आनंद मिळतोय..', असं अरबाज म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी ऑफर, पण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget