Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडली, पोटदुखीचा त्रास; पार पडली महत्त्वाची शस्त्रक्रिया
Sairat Fame Actor Tanaji Galgunde Health Update : 'सैराट' चित्रपटातील अभिनेता तानाजी गलगुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे.
Actor Tanaji Galgunde Health Update : 'सैराट' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर येत आहे. 'सैराट' चित्रपटातील अभिनेता तानाजी गलगुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समोर आलं आहे.
'सैराट' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडली
सैराट चित्रपटातील लंगड्या म्हणून नावलौकिक मिळवलेला अभिनेता तानाजी गलगुंडे याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शासकीय रुग्णालयात नागरिकांनी उपचार घेण्याचं आवाहन तानाजीनं केलं आहे. तानाजीला केल्या काही काळापासून पोटदुखीचा त्रास सुरु होता, अचानक पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.
नुकतीच पार पडली महत्त्वाची शस्त्रक्रिया
अभिनेता तानाजी गलगुंडे याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. अभिनेता तानाजी गलगुंडे याला अनेक वर्षांपासून पोट दुखीचा त्रास होता. विविध ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातचं उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
शासकीय रुग्णालयात लेप्रोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया
शासकीय रुग्णालयात डॉ. संजीव ठाकूर यांनी तानाजी गलगुंडेवर लेप्रोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया केली. यावेळी अभिनेता तानाजी गलगुंडे याने शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांचे कौतुक करत गरीब रुग्णांनी शासकीय रुग्णालयात मोफत मिळणाऱ्या उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे. शासकीय रुग्णालय म्हटलं की अनेक जण तिथे मिळणाऱ्या सुविधाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करताना दिसतात. मात्र तानाजी गलगुंडे याने येथे मिळणाऱ्या उपचारांचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :