Saif Ali Khan Injured: सिक्युरिटी नव्हती? कुणी बेडरूममध्ये कसं घुसू शकतं? कौटुंबिक वादाचं कारण तर नाही? सैफवरच्या हल्ल्यानंतर चाहते हैराण, चर्चांना उधाण
Saif Ali Khan Injured: सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयातदाखल करण्यात आलं असून तिथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर देशभरात खळबळ पसरली आहे.
Saif Ali Khan Injured: आधी बाबा सिद्दिकींची (Baba Siddiqui) हत्या, त्यानंतर सलमान खानला (Salman Khan) सातत्यानं येणाऱ्या जीवेमारण्याच्या धमक्या आणि आता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला... एकापाठोपाठ एक अशा खळबळजनक घटनांनी बॉलिवूड इंडस्ट्री पुरती हादरून गेली आहे. सैफ अली खानच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात इसमानं सैफ अली खानवर तब्बल सहा वेळा हल्ला केला. त्यापैकी एक जखम त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ झाली होती. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयातदाखल करण्यात आलं असून तिथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर देशभरात खळबळ पसरली आहे. सोशल मीडियावर तर या घटनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिक्योरिटी नव्हती? कुणी बेडरूममध्ये कसं घुसू शकतं? कौटुंबिक वादाचं कारण तर नाही? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी तर हे प्रकरण वेगळंच असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद घालू लागला. जेव्हा अभिनेत्यानं मध्यस्थी करून तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केलं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
"चोरीचं प्रकरण वाटत नाही..."
सैफवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना जशी समोर आली, नेटकऱ्यांच्या रिअॅक्शनदेखील समोर आल्या. आता ट्विटरवर #SaifAliKhan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. एका युजरनं लिहिलंय की, "वाटत नाही की, ही चोरीची घटना आहे. मुंबईमध्ये एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात घुसणं एवढं सोपं नाही."
"सुरक्षारक्षकांचा वेढा असणाऱ्यांच्या घरात कुणी कसं घुसू शकतं?"
आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, "अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सैफच्या घरात घुसणारी व्यक्ती 24/7 सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या घरात कशी शिरू शकते? मिडल क्लास गेटेड सोसायटीमध्येही 24/7 सुरक्षा असते. एन्ट्री करताना चौकशी होते, कोणताही चोर न कळत घरात शिरूच कसा शकतो? सगळं संशय व्यक्त करणारं आहे."
घटनेनंतर सैफिनाची प्रतिक्रिया समोर
हल्ल्यानंतर, करीना आणि सैफच्या टीमकडून प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सांगितलं की, सैफच्या हाताला दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुटुंबातील बाकीचे सर्वजण ठीक आहेत. धीर धरा आणि ही पोलिसांची बाब आहे. ते तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attack : मदतनीसाला भेटायला आला,सैफवर हल्ला केला; ‘तो’ नेमका कोण होता?
महत्त्वाच्या इतर बातम्या :