Saif Ali Khan Health Update: 6 दिवसांपासून रुग्णालयात सैफ अली खान; आता तब्येत कशी? डिस्चार्ज कधी मिळणार?
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्या राहात्या घरात चाकूहल्ला झाला. तेव्हापासून सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्याची प्रकृती आता बरीच सुधारली आहे. अशातच आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
Saif Ali Khan Discharge From Hospital: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 16 जानेवारी रोजी राहात्या घरात चोरट्यानं घुसून चाकूहल्ला केला. या हल्लात सैफ अली खान गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारांसाठी वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. सैफ अली खानवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या पाठीत चोरट्यानं चाकू भोसकला होता. त्याच्या पाठीतून शस्त्रक्रिया करुन चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढला गेला. त्यानंतर सैफ अली खानला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात आलं होतं. अशातच आता सैफची तब्येत उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.
सैफ अली खानची तब्येत आता उत्तम आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. अशातच सैफला डिस्चार्च कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सैफ अली खानला डिस्चार्ज कधी?
सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफची तब्येत आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली असल्याची माहिती आहे. मंगळवारी, डॉक्टर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, अभिनेत्याला सध्या बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक
पोलिसांनी सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 30 वर्षांचा आहे आणि तो बांगलादेशचा नागरिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपी बांगलादेशातील प्रोफेशनल कुस्तीपटू आहे. आरोपी सध्या 14 दिवसांच्या रिमांडवर आहे. पोलीस त्याची सतत चौकशी करत आहेत आणि अनेक खुलासेही करत आहेत.
विरोधकांकडून पोलिसांच्या थिअरीवर प्रश्न उपस्थित
दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधकांनी पोलिसांच्या थिअरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, हल्लेखोर 6 महिन्यांपूर्वी बांगलादेशहून आला होता? हे षड्यंत्र आहे का? की, त्यांना आणलं जात आहे? भाजप 10 वर्षांपासून सत्तेत आहे, बांगलादेशी का येतायत? राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जयंत पाटील म्हणाले की, पोलिसांच्या कथेवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. पण तो बांगलादेशी नागरिक आहे आणि तो खरोखरंच तोच व्यक्ती होता, जो सैफ अली खानच्या घरात घुसला होता का? असे अनेक प्रश्न विरोधकांकडून शेअर केले जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :