Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मदकडून काय मिळालं? बांगलादेशी असल्याचा संशय, प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलीस काय म्हणाले?
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आज मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी (Saif Ali Khan Attack) एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आज मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पत्रकार परिषद (PC) घेत माहिती दिली आहे. पोलिस उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी माहिती देताना आरोपी भारतीय नसल्याची माहिती दिली आहे, तर मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. त्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीच्या माध्यमातून आणि उत्तरातून त्याचबरोबर त्याच्याकडे सापडलेल्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर तो बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे.
काय माहिती दिली पोलिसांनी?
16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक आरोपी गेला होता. मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असे या आरोपीचे नाव आहे, या आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस कस्टडीची मागणी केली जाईल. हा आरोपी बांगलादेशी असल्याचा आम्हाला संशय असून त्या अनुशंगाने आम्ही गुन्ह्यांच्या कलमात वाढ केली आहे, त्याची चौकशी केली जाईल. हा आरोपी बांगलादेशी आहे, भारतात तो अवैध रित्या राहत असल्याची माहिती आहे. भारतात आल्यानंतर त्याने स्वत:चं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद हे नाव बदलल त्याने स्वताचं नाव विजय दास ठेवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत त्याची उत्तरातून काही माहिती मिळालेली आहे. हत्यार मिळालेलं आहे. या आरोपीची चौकशी सुरू आहे, पुढची माहिती लवकरच देण्यात येईल, असंही पुढे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय प्रकरण?
गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे समोर आले आहे. सैफच्या घरातील नर्सने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोराने 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. सैफ अली खानवरील हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे, ज्यामध्ये संशयित इमारतीतून पळून जाताना दिसत आहे. या प्रकरणात, मुंबईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.























