Rajshri Deshpande: Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक
Sacred Games Actress Rajshree Deshpande Cancer Battle: बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचे निदान झाले आहे. तिनं अलिकडेच पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती.

Rajshri Deshpande breast cancer diagnosis story: Life is Unpredictable असं आपण अनेकदा म्हणतो. कधी काय घडेल सांगता येत नाही. कधी कोण आपल्याला सोडून जाईल, हे देखील सांगणं कठीणच. अलिकडेच सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेबसिरीजमधून (Web Series) प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कॅन्सरच्या कचाट्यात सापडली आहे. राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast Cancer) निदान झाले आहे. तिनं सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली. अभिनेत्रीवर (Rajshree Deshpande) सध्या उपचार सुरु आहेत. तिनं रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. तसेच कॅप्शन देत आपली आपबिती सांगितली.
कॅन्सरग्रस्त राजश्री देशपांडेने सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं रुग्णालयातील फोटो पोस्ट केले आहेत. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा रुग्णालयातील रिपोर्ट सेंटरबाहेर मी एकटीच होते. मी रिपोर्ट पाहून पूर्णपणे खचून गेले होते. मी स्वत:ला सावरु शकले नाही. याची माहिती मिळताच अनेकांनी, तू इतकी फिट आहेस? मग कसा हा आजार तुला झाला? असा प्रश्न विचारला. पण खरंच सांगू माझ्याकडे याचे उत्तर नाही. या आजाराचा त्रास केवळ शारीरिक नव्हता. मानसिक, भावनिक होता. मी बऱ्याचदा रडले. कारण या वेदना असह्य होते. मला प्रचंड त्रास झाला', असं अभिनेत्री म्हणाली.
'या काळात मला मित्रांची विशेष साथ लाभली. कधी कधी मी हार मानणार नाही, असं ठरवते. पण कधी कधी असेही दिवस येतात, मला काहीच नकोसं वाटतं. शांत राहू वाटतं. किंवा मेरी ऑलिव्हरच्या कवितेसारखं, खिडकीवर चिमणीसोबत सुर्योदय पाहू वाटतं. सकाळी आनंदाने उठणे याला खरंच आपण Achievement म्हणू शकतो का? आज मी स्वत:साठी हसले आणि स्वत: ला मिठी मारली. ज्यांनी मला या प्रवासात फोन केला. मेसेज केले. माझी विचारपूस आणि प्रेम दिल्याबद्दल आभार', असं म्हणत राजश्रीने मदत आणि आधार देणाऱ्यांचे आभार मानले.
View this post on Instagram
'मला माहित नाही पण, पुन्हा एकदा नव्याने नवीन संघर्षासाठी तयार राहावं लागेल. ', असं आपल्या पोस्टमध्ये राजश्री म्हणाली. तिनं एकंदरीत आपल्या भावना व्यक्त केल्या असल्याचं दिसून येत आहे.






















