Sachin Pilgaonkar On Veteran Film Maker Guru Dutt: 'माझ्यासोबत फिल्म करणं हीच गुरूदत्त यांची शेवटची इच्छा...'; त्यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकरांनी एकही रुपया न घेता केलेला चित्रपट
Sachin Pilgaonkar On Veteran Film Maker Guru Dutt: भारतीय सिनेमांच्या इतिहासातलं मोठं नाव म्हणजे, निर्माते दिग्दर्शक गुरूदत्त. यांच्या सिनेमांवर, पटकथांवर आजही अभ्यास केला जातो.

Sachin Pilgaonkar On Veteran Film Maker Guru Dutt: दिग्गज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गायक असलेलं मराठमोळं नाव म्हणजे, सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar). गेल्या काही दिवसांत सचिन पिळगांवकरांचे अनेक किस्से व्हायरल होत आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या आजवरच्या कारकीर्दीत सचिन पिळगांवकरांनी अनेक दिग्गजांसोबत स्क्रिन शेअर केली. अगदी बालवयातच सचिन पिळगांवकरांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. 'नदीया के पार' या सिनेमात तर ते मुख्य भूमिकेत झळकलेले. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालेलं. अशातच आता सचिन पिळगावकरांची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये भारतीय सिनेमांच्या इतिहासातले दिग्गज निर्माते दिग्दर्शक गुरूदत्त (Director Guru Dutt) यांनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या सिनेमाची आठवण सांगितली आहे.
भारतीय सिनेमांच्या इतिहासातलं मोठं नाव म्हणजे, निर्माते दिग्दर्शक गुरूदत्त. यांच्या सिनेमांवर, पटकथांवर आजही अभ्यास केला जातो. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेली अनेक चित्रपट कल्ट सिनेमांच्या यादीत समाविष्ट होतात. याच गुरुदत्त यांची शेवटची इच्छा सचिन पिळगांवकरांसोबत काम करण्याची होती, असं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं. एवढंच नाहीतर त्यांच्यासाठी गुरूदत्त यांनी एक स्क्रिप्ट लिहिलेली, पण रुपेरी पडद्यावर ती साकारण्यापूर्वीच गुरूदत्त यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली.
सचिन पिळगांवकरांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
सचिन पिळगांवकरांनी यांनी त्यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणतात, "मी शेअर केलेला हा फोटो चंदा और बिजली (1968) सिनेमाच्या मुहूर्ताचा शॉट आहे. ज्यात मी चंदा ही भूमिका साकारली होती. हा सिनेमा चार्ल्स डिकन्स या इंग्रजी लेखकाची कथा ऑलिव्हर द्विस्ट यापासून प्रेरित होता. त्यावेळी सिनेमाचं शीर्षक त्यावेळी ठरलं नव्हतं त्यामुळे क्लॅपवर प्रॉडक्शन नंबर 12 असं लिहिलेलं दिसत आहे. गुरुदत्त जींना 1966 मध्ये हा सिनेमा मला घेऊन बनवायचा होता पण त्यावेळी मी त्या भूमिकेसाठी व वर्षांनी लहान होतो. त्यामुळे त्यांनी मला अकरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा बनवायचं ठरवलं आणि त्यावेळी त्यांनी बहारें फार भी आयेगी या सिनेमाचं काम सुरु केलं. पण हा सिनेमा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं, या सिनेमात ते धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करत होते. 1968 मध्ये गुरुदत्तजींचे धाकटे बंधू आत्मारामजींनी त्यांच्या मोठ्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सिनेमा बनवला."
View this post on Instagram
सचिन पिळगांवकरांच्या आत्मचरित्रातही लिहिलाय किस्सा
सचिन पिळगांवकरांच्या आत्मचरित्रातही गुरुदत्त यांचा हा किस्सा आहे. त्यांनी एक आठवण लिहिलीय...जेव्हा सचिन पिळगांवकर अकरा वर्षांचे होते, त्यानंतर एक दिवस त्यांना गुरूदत्त यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्यावेळी सचिन यांचे वडिल त्यांना गुरूदत्त यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेले. गुरूदत्त त्यावेळी हयात नव्हते... तो फोन त्यांचे धाकट्या बंधूंनी केलेला. त्यांनी स्क्रिप्ट दाखवली जी गुरुदत्त यांनी हातानं लिहिली होती. जयवंत ऑलिव्हर असं लिहिलं होतं. ते उघडल्यावर नोंद केली होती की, "टू बी मेड विथ सचिन, व्हेन इलेव्हन". त्यावेळी सिनेमासाठी एकही रुपया मानधन घेणार नसल्याचं सांगत सिनेमात काम केलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















