Ruchita Jadhav Social Media Post ON Rohit Aarya: दैव बलवत्तर अन् मराठी अभिनेत्री थोडक्यात वाचली, रोहित आर्यनं कालच आर.के. स्टुडिओत बोलावलं होतं, पण....
Ruchita Jadhav Social Media Post ON Rohit Aarya: पवईतील प्रकरणात रोहित आर्यनं स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत मराठी अभिनेत्रींसोबत संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं अनेक मराठी अभिनेत्रींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय.

Ruchita Jadhav Social Media Post ON Rohit Aarya: मुंबईतील हायप्रोफाईल परिसरात 17 मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यानंतर आरोपी रोहित आर्यचा एन्काऊंटर, यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे अनेक पैलू आता समोर येत आहेत. रोहित आर्यनं 17 मुलांना ओलीस ठेवून सरकारवर गंभीर आरोप केलेले आणि सरकारनं आपले तब्बल 2 कोटी थकवल्याचा आरोपही केलेला. तसेच, त्यानं दीपक केसरकरांशी फोनवर बोलण्याची मागणीही केलेली. रोहित आर्यनं एक वेब सीरिज करत असल्याचं सांगून मुलांना ऑडिशनला बोलावलेलं. अशातच आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रोहित आर्यनं स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत एका मराठी अभिनेत्रीशी संपर्क साधलेला.
पवईतील प्रकरणात रोहित आर्यनं स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत मराठी अभिनेत्रींसोबत संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं अनेक मराठी अभिनेत्रींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. त्यापैकी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशीही त्याने संपर्क साधला होता. स्वतःला प्रोड्युसर असल्याचं सांगत तो एक चित्रपट तयार करत असल्याचं खोटं सांगण्यात आलं होतं.

हा प्रकार उघड झाल्यानंतर रुचिता जाधवनं स्वतः सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. Instagram स्टोरीद्वारे, हा संपूर्ण प्रकार उघड केला. तिच्या या पोस्टनंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली असून इतर अभिनेत्रींपर्यंतही या व्यक्तीनं अशाच प्रकारे संपर्क साधल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं घडलं काय?
गुरूवारी अख्खी मुंबई हादरवणारी घटना घडली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं. वेब सीरिजसाठी ऑडिशन घेण्याच्या निमित्तानं यानं 17 मुलांची निवड केली आणि त्यांना मुंबईतील हायप्रोफाईस परिसर म्हणून ओळख असणाऱ्या पवईत ओलीस ठेवलं. त्यानंतर त्यानं एक व्हिडीओ जारी केला, ज्यामध्ये तो दहशतवादी किंवा पैसे मागणारा अपहरणकर्ता नसल्याचं म्हटलं होतं. तसेच, सरकरारनं दोन कोटी थकवल्याचं सांगत त्यानं अनेक गंभीर आरोप केले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, रोहित आर्य गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता आणि त्यामागील कारण म्हणजे, सरकारनं त्यांच्यावर केलेला अन्याय होता. रोहितनं दावा केला की, तो अलिकडेच सरकारविरुद्ध उपोषणाला बसला होता. त्यानं स्पष्ट केलं की, त्यानं शिक्षण विभागासाठी एक प्रकल्प विकसित केला होता आणि त्यासाठी त्यानं बँकेचं कर्जही घेतलं होतं. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' नावाच्या या उपक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला. सरकारनं त्यासाठी पैसे देण्यास नकार दिला, ज्यामुळे रोहितचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























