(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RRR : रिलीज होण्याआधीच 'आरआरआर'चा धुमाकूळ; केली कोट्यवधींची कमाई
RRR : रिलीज होण्याआधीच आरआरआर या चित्रपटानं तब्बल 750 कोटींची कमाई केली आहे.
RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli)यांच्या 'बाहुबली' या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. एसएस राजामौली यांच्या चित्रपटामधील भव्य सेट्स हे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. त्यांच्या बाहुबली आणि 'बाहुबली- द कन्क्लूजन' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड या चित्रपटांनी मोडले. एसएस राजामौली यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट आज (25 मार्च)प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) ही जबरदस्त स्टार कास्टनं या चित्रपटामध्ये काम केले आहे. प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटानं तब्बल 750 कोटींची कमाई केली आहे.
आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 22 मार्चपासून प्री बुकिंगची सुरूवात केली. प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 750 कोटींची कमाई केली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सर्व भाषांमधील प्री-रिलीज थियेट्रिकल बिजनेस हा 520 कोटी आहे. तसेच पेन इंडियानं या चित्रपटाचे उत्तर भारतातील डिस्ट्रिब्यूशन, डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स विकत घेतले आहेत.
'आरआरआर' बिग बजेट चित्रपट
रिपोर्टनुसार, आरआरआर हा चित्रपट तयार करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनं 45 कोची रूपये मानधन घेतलं आहे तर आलियनं नऊ कोटी मानधन घेतलं. अजय देवगणनं या चित्रपटात कमी वेळासाठी स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 कोटी फी घेतली आहे.
संबंधित बातम्या
- RRR : आरआरआरच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक; साडीची किंमत माहितीये का?
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha