'आता मालिका करावीशी वाटत नाही', अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी सांगितलं कारण, म्हणाल्या..
नाटक सिनेमा, मालिका अशा सगळ्या पद्धतीचं काम करत आपल्या सहज आणि प्रगल्भ अभिनयानं पाहणाऱ्याला खिळवून ठेवणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतंच टेलिव्हिजनवर फार काम करण्याची इच्छा होत नसल्याचं सांगितलं.
Rohini Hattangady: मराठी प्रेक्षकांच्या मनात 'होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील आई आजी म्हणून राज्य केल्यानंतर मालिकांमध्ये फारशा न दिसणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत टेलिव्हिजन न करण्यामागचं कारण सांगितलं. करियरची ५० वर्षे मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, गुजराती रंगभूमी गाजवल्यानंतर चारचौघी नाटकातून पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या उतरल्या. पण आता मालिका हवं ते समाधान देऊ शकत नसल्याचं त्यांनी अमोल परचुरे यांना मुलाखत देताना नुकतंच सांगितलंय.
आता टेलिव्हिजन नाही करावसं वाटत
नाटक सिनेमा, मालिका अशा सगळ्या पद्धतीचं काम करत आपल्या सहज आणि प्रगल्भ अभिनयानं पाहणाऱ्याला खिळवून ठेवणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतंच टेलिव्हिजनवर फार काम करण्याची इच्छा होत नसल्याचं सांगितलं. तिथे काम करताना फारसं समाधान मिळत नाही. काम करण्यासाठीचं जे वातावरण आहे ते अजीबात सोयीस्कर नाही असं मला स्वत:ला वाटतं. असं त्या म्हणाल्या. सिरियल न करण्यामागचं कारण सांगणाऱ्या मुलाखतीची क्लिप त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
View this post on Instagram
रात्री ११ वाजता सांगतात उद्या शिफ्ट ८ वाजता आहे..
जर माझ्याकडे एका हातात नाटक असेल आणि दुसरीकडे सिरियल असेल तर मी सिरियल नाही करणार. ती कितीही लांब चालणारी असेल तरी माझं प्राधान्य नाटकालाच असेल. नाटात कितीही प्रयोग झाले तरी मला समाधान मिळतंय. आज काय सीन करायचा ते माहित नाही. काल रात्री ११ वाजता सांगण्यात येतं, उद्या सकाळी ८ वाजताची शिफ्ट आहे. हे मला जमत नाही. असं रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या. टेलिव्हिजनमध्ये काम करण्याची जी परिस्थिती आहे, ती माझ्यासाठी अजिबात अनुकूल नाही. असं मला स्वत:ला वाटतं. माझ्या हातात एखादं नाटक असेल आणि माझ्याकडे एखादी मालिका आली तर, मी नाटक करेन पण मालिका नाही करणार. जरी ती मालिका दीर्घ काळ चालणारी असेल, मला ती उत्पन्नाचं साधन देणारी असली तरी सुद्धा माझी पसंती नाटकाला असेल. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा: