Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
Aastad Kale : चिन्मय मांडलेकरने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं त्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावर आता आस्ताद काळेने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
Aastad Kale : अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे त्याचा मुलगा जहांगीरच्या नावाने झालेलं ट्रोलिंग होतं. मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा हिला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. त्यावर अनेक मराठी कलाकारांनी चिन्मयला पाठिंबा देखील दिला होता. त्याच मुद्द्यावरुन आता अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
आस्ताद काळे हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायमच चर्चेत असतो. अनेकदा सोशल मीडियावर कोणत्याही घटनेवर त्याची स्पष्ट मतंही मांडतो. त्यावरही त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यातच आता त्याने चिन्मयला केलेल्या ट्रोलिंगवरही त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. चिन्मयने नुकतीच आरपार या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
आस्ताद काळेने काय म्हटलं?
चिन्मयचंही ट्रोलिंग झालं, तुझंही नाव तसंच आहे, त्यावर तुझं मत काय? यावर आस्तादने म्हटलं की, नशिबाने आस्ताद नावाचा कोणताही सुल्तान वैगरे होऊन गेलेला नाहीये. मला असं वाटतं की हा फार वैयक्तिक प्रश्न आहे.गजानन नावाचा क्रिमिनल होऊ नाही शकत का? आहेत ना, राजन नावाचे क्रिमिनल होऊन गेले. त्यामुळे नावात काही नसतं, तुम्ही घरी संस्कार काय करता त्यावर सगळं अवलंबून असतं. पण प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे नेण्याची एक मनोवृत्ती आहे. मी त्याला विरोधही करणार नाही आणि पाठिंबा तर मुळीच देणार नाही.मी यामध्ये तटस्थ राहिन आणि चिन्मय, नेहा तितके सज्ञान आहेत की, ते हे सगळं हँडल करतील.
तेव्हा धार्मिक भावना बोथट नव्हत्या - आस्ताद काळे
दरम्यान आस्ताद हे फारसी किंवा पर्शियनमध्ये येतं. त्यावर आस्तादने म्हटलं की, तेव्हा धार्मिक भावना इतक्या बोथट नव्हत्या. एकतर हे नाव फारसी किंवा पर्शियन आहे, हेच फार लोकांना माहित नाही. त्यातच या नावाचा कोणी सुल्तान, आक्रमणकरता नाही झाला, आतापर्यंत तरी इतिहासात असं काही आलं नाहीये. पुढे आलं तर माझ्याही नावाचं ट्रोलिंग होईल.मग बघू काय करायचं ते, असं आस्तादनं म्हटलं.
ही बातमी वाचा :
Dance Deewane 4 Winner : गौरव-नितिन ठरले 'डान्स दीवाने 4'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाले 20 लाख रुपये