Rishabh Shetty Kantara Chapter 1 Trailer Out: पंजूर्ली देवाचा इतिहास अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'चा शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Rishabh Shetty Kantara Chapter 1 Trailer Out: ऋषभ शेट्टी 'कांतारा'चा प्रीक्वेल घेऊन येत आहे. 'कांतारा चॅप्टर 1'चा (Kantara Chapter 1) ट्रेलर रिलीज केला आहे.

Rishabh Shetty Kantara Chapter 1 Trailer Out: सध्या बॉलिवूडपेक्षा (Bollywood News) साऊथ सिनेमांची (South Movie) चलती आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षांत कन्नड सिनेमांनी (Kannada Cinema) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यापैकी काही सिनेमांची नावं घ्यायची झाली तर, ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमाचं नाव सर्वात आधी येतं. 2022 मध्ये, आलेल्या ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व अशी कामगिरी केली. अशातच आता ऋषभ शेट्टी 'कांतारा'चा प्रीक्वेल घेऊन येत आहे. 'कांतारा चॅप्टर 1'चा (Kantara Chapter 1) ट्रेलर रिलीज केला आहे.
'कांतारा चॅप्टर 1'चा ट्रेलर रिलीज
'कांतारा चॅप्टर 1'ची रिलीज डेट सुरुवातीला 2 ऑक्टोबर 2025 ही निश्चित करण्यात आलीय. अनेक निर्माते त्यांच्या सिनेमाची मार्केटिंग तब्बल 21 ते 30 दिवस आधी सुरू करतात. टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करतात, तर 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायला फक्त 10 दिवस शिल्लक असताना सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
View this post on Instagram
'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर मागील भाग जिथे थांबलेला, तिथून सुरू होतो. यावेळी, कथा कांताराच्या पौराणिक इतिहासात डोकावते, ज्या कथेबद्दल आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हती. निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये फारशी गुपितं उघड केलेली नसली तरी, त्यांनी निश्चितच काही प्रमाणात गूढ, रहस्य कायम ठेवली आहे. या प्रीक्वेलभोवतीचा हा सस्पेन्स चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणार, यात काही शंका नाहीच.
'कांतारा चॅप्टर 1'मध्ये काय आहे खास?
'कांतारा चॅप्टर 1'मध्ये ऋषभ शेट्टीची भूमिका नेमकी काय असणार? हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, हा चित्रपट बनवण्यासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतली आहे. त्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत मिळून 'कांतारा चॅप्टर 1'साठी एक भव्य युद्ध सीन तयार केलाय, ज्यामध्ये 500 हून अधिक कुशल सैनिक आणि 3,000 लोक सहभागी झाले होते. हा सीन 25 एकर शहरात, खडकाळ भूभागावर 45-50 दिवसांत चित्रित करण्यात आला, ज्यामुळे तो भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या सीन्सपैकी एक आहे.
दरम्यान, 'कांतारा चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होईल. या सिनेमाचा पहिला भाग खूप गाजला होता. तेव्हापासूनच या सिनेमाचा पुढचा भाग येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या. अशातच ऋषभ शेट्टीनं 'कांतारा चॅप्टर 1' ची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
पाहा ट्रेलर :























