'इक्कीस'च्या प्रीमियरला रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातवाचं पोस्टर पाहिलं अन् फ्लाईंग किस दिला, नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या VIDEO
या चित्रपटातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अगस्त्य नंदाची ही पहिलीच थिएटर रिलीज होणारी फिल्म आहे.

Bollywood: अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे दिवंगत अभिनेते धर्मेंद्रही या सिनेमात झळकणार असून, हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोमवारी पार पडला.या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रेखाही (Rekha) खास उपस्थित होत्या. या प्रेमियर दरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातवाचं पोस्टर पाहिलं अन् फ्लाईंग किस दिला,हे बघून नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. याचे VIDEO सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
अमिताभ बच्चनच्या नातवावर रेखाचा प्रेमवर्षाव
या प्रीमियरला सलमान खान, बॉबी देओल, सनी देओल यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. सर्वांनी धर्मेंद्र यांच्या पोस्टरजवळ उभं राहून फोटो काढले आणि भावूक होताना दिसले. रेखाने ग्रेसफुल अंदाजात एन्ट्री केली. सर्वप्रथम त्यांनी धर्मेंद्र यांच्या पोस्टरसमोर हात जोडून नमस्कार केला. नंतर रेखा पुढे सरकल्या आणि चित्रपटाचा लीड हिरो, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या फोटोला फ्लाईंग किस दिलं. रेखाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अगस्त्य नंदाच्या पोस्टरवर प्रेमाचा वर्षाव करतानाचे रेखाचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात रेखा हिरव्या रंगाच्या साडीत अतिशय देखण्या दिसत होत्या. एकेकाळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. रेखाजींनी अगस्त्यला दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहेत.
‘इक्कीस’ कधी होणार प्रदर्शित?
‘इक्कीस’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, आधी हा सिनेमा डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर तो पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं असून, निर्मिती दिनेश विजान यांची आहे.
या चित्रपटातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अगस्त्य नंदाची ही पहिलीच थिएटर रिलीज होणारी फिल्म आहे. याआधी तो नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’मध्ये दिसला होता. त्या चित्रपटात सुहाना खान आणि खुशी कपूर यांचंही पदार्पण झालं होतं. ‘द आर्चीज’चं दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केलं होतं.























