एक्स्प्लोर

एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये .. मराठी रिलस्टारच्या मृत्यूचं कारण समोर; सोशल मीडियावर खळबळ 

प्रथमेश कदमची मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सई उतेकरने एक व्हिडिओ शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूचं कारण सांगितलं आहे.

Reelstar Prathamesh Kadam Death Reson: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला मराठमोळा रिलस्टार  प्रथमेश कदमचे 26 जानेवारीला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून प्रथमेश आजारी होता.  त्याच्या अचानक जाण्याने  सोशल मीडिया विश्वासह त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रथमेश आणि त्याचे आई प्रज्ञा कदम दोघा माय -लेकाची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय होती. प्रथमेशच्या मृत्यूनंतर त्याची आई आणि लहान बहिण आहे.  प्रथमेशच्या जाण्याने अनेक कलाकारांना धक्का बसलाय. इतक्या लहान वयात त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? त्याला काय झालं होतं असे अनेक प्रश्न लाखो चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान प्रथमेश कदमची मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सई उतेकरने एक व्हिडिओ शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूचं कारण सांगितलं आहे.

कशाने झाला प्रथमेश कदमचा मृत्यू ?

सहीने एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं" खूप जणांचे फोन आणि मेसेजेस आले. खूप जणांना प्रश्न पडला आहे की नक्की काय झालं ? प्रथमेशला अचानक काय झालं ? तू खूप हेल्दी आणि चांगला होता. सगळे स्टोरी टाकत आहेत की त्याचं निधन झालं. खूप जणांना धक्का बसलाय. काही जणांना विश्वासही बसत नाहीय . चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. '

ती पुढे म्हणाली 'एक महिन्यांपासून प्रथमेश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता . त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. त्याच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. पोटातील इन्फेक्शन जाण्यासाठी आणि तो पूर्ण बरं होण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. प्रथमेशच्या घरच्यांनीही शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले . पण ते त्याला नाही वाचवू शकले . "26 जानेवारी 2026 रोजी पहाटे चारच्या दरम्यान त्याचे निधन झाल्याची माहिती सहीने दिली. ती म्हणाली त्याचे अंत्यविधी झाले आहेत. कोणीही त्याच्या आईला बहिणीला मेसेज करून विचारू नका . " मी स्टोरी टाकण्याचं कारण हेच आहे की आम्ही पर्सनली कोणालाही सांगू शकत नाही. खूप लोकांचे फोन मेसेजेस येत आहेत त्यांना आम्ही कळवतोय .प्लीज समजून घ्या आणि कुणालाही प्रश्न विचारू नका . प्रथमेशच्या निधनानंतर सहीने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे अनेक फोटो ही शेअर केले आहेत. 'मिस यु रे पतू ' असं म्हणत तिने श्रद्धांजली वाहिली आहे . त्या दोघांनीही अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं होतं .

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sae Sanjay Utekar (@sae.utekar)

वडिलांच्या निधनानंतर त्यांना रिल्स तयार करत आपली एक खास ओळख निर्माण केली होती. वडिलांच्या दुःखातून सावरण्यासाठी त्यानं रिल्स तयार करण्यास सुरुवात केली होती असं प्रथमेशने यापूर्वी सांगितलं होतं . रिल्स व्यतिरिक्त तो म्युझिक अल्बम्समध्येही झळकला होता. instagram स्पॉन्सरशिप, रील मॉनिटायझेशन तसेच अनेक ब्रँड प्रमोशनमधून तो आपल्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभा होता . प्रथमेशने 2024 साली मेटाच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्टेज शेअर केला होता .

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर दणाणलं, किती कमावले?
यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर दणाणलं, किती कमावले?
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget