बोल्ड-बिनधास्त, अभिनेत्री रविना टंडन शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात; उद्धव ठाकरेंचं केलं कौतुक, VIDEO व्हायरल
Raveena Tandon participates in Shiv Sena Thackeray group: रवीना टंडन वांद्रे पश्चिम प्रभागात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार रॅलीत हजेरी लावली.

Raveena Tandon participates in Shiv Sena Thackeray group rally: संपूर्ण राज्याचं लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे आहे. सर्वत्र महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नेते मंडळी असो किंवा स्टार. प्रचाराचा झेंडा हातात घेऊन अनेक जण मैदानात उतरलेत. काल प्रचाराचा शेवटचा रविवार होता. राजकीय पक्षासह उमेदवारांसाठी हा दिवस महत्त्वाचा होता. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस. रविवारी प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. अक्षरश: शहर पिंजून काढलं. या सर्व धामधुमीत स्टार कलाकारांनीही राजकीय प्रचारासाठी हजेरी लावली. अभिनेत्री रविना टंडन देखील प्रचाराच्या मैदानात उतरली असल्याचं पाहायला मिळालं. ती शिवसेना शिंदे गटाकडून प्रचारासाठी मैदानात उतरली. तिच्या गळ्यात शिवसेनेचा गमछा पाहायला मिळाला. 90 च्या दशकातील अभिनेत्रीच्या गळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा गमछा दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिनेत्री रविना टंडन हिनं 90चं दशक गाजवलं. तिचे अनेक चित्रपट हिट ठरले. मात्र, ती सध्या राजकारणात उतरली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चर्चांना कारण म्हणजे तिचा लेटेस्ट व्हायरल होणारा व्हिडिओ. या व्हिडिओत रवीना टंडन शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार करताना दिसली. तिच्या गळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा गमछा होता. यावेळी तिनं मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं. तसेच कला, संस्कृती आणि समाजाच्या निगडीत मुद्द्यांवर प्रचार करताना दिसली.
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 101 मधील अक्षता मेनझेस या शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार उभे आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराने आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी प्रचार रॅली काढली. या रोड शोमध्ये रवीना टंडन देखील सहभागी झाली होती. ही पदयात्रा रॅली चिंबई ते कांतवाडी परिसरातून निघाली. या प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण रवीना टंडन ठरली. तिला पाहण्यासाठी परिसरात लोकांची गर्दी जमली होती. रविना टंडनने यावेळी गळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा 'मशाल' चिन्हाचा गमछा घातला होता. यावेळी तिनं मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रवीना म्हणाली, "महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी जे काही प्रामाणित प्रयत्न सुरू आहेत, या गोष्टीला साथ देणं माझं प्रथम कर्तव्य आहे. संकटकाळात ज्या पद्धतीनं काम झालं, हे कौतुकास्पद आहे", असं रवीना म्हणाली. दरम्यान, प्रचारादरम्यानचा तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. सध्या रवीनाचा प्रचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
























