(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmika mandanna and Vijay : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचं चाललंय तरी काय? आता लीक फोटोंनी चर्चा रंगली!
Rashmika mandanna and Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अॅनिमल (Animal) सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रश्मिका (Rashmika Mandanna) मांदना सध्या त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
Rashmika mandanna and Vijay Deverakonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अॅनिमल (Animal) सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रश्मिका (Rashmika Mandanna) मांदना सध्या त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले आहेत. रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या दोघांच्या नाताबाबत मौन सोडलय. दरम्यान, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या फोटोंवर लाईक आणि फोटोंचा पाऊस पाडत आहेत.
रश्मिका आणि विजय डेटींगच्या चर्चा
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते. सध्या रश्मिका आणि विजय एकत्रित वेळ घालवताना पाहायला मिळाले आहेत. या फोटोंमध्ये देवरकोंडा फार आनंदी दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. विजय देवरकोंडा रश्मिकासोबत सुट्ट्या एंजॉय करत असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलय की, या स्मितहास्याचे कार ण रश्मिका मांदना आहे.
रश्मिका-विजयचा खरचं साखरपुडा होणार? (Rashmika Mandanna Vijay Devarkonda)
रश्मिका आणि विजयने अद्याप त्यांचं रिलेशन जगजाहीर केलेलं नाही. आता विजयच्या टीमने साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर याबद्दल मौन सोडलं आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, दोन्ही कलाकारांच्या टीमने सारखपुड्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. रश्मिका आणि विजय हे मनोरंजनसृष्टीतलं चर्चेत असणारं कपल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि विजयची पहिली भेट झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा गाजला. त्यानंतर 'डियर कॉम्रेड' या सिनेमात ते एकत्र झळकले. दोघांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण त्यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यातच ठेवलं आहे. पण तरीही त्यांच्या अफेरच्या चर्चा मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
रश्मिका-विजयच्या आगामी कलाकृतींबद्दल जाणून घ्या... (Rashmika Mandanna Vijay Deverkonda)
रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमातही ती दिसणार आहे. तसेच रेनबो, द गर्लफ्रेंड आणि चावा हे तिचे आगामी सिनेमे आहेत. दुसरीकडे विजयचे 'फॅमिली स्टार' 'वीडी 12' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तसेच त्यांच्या आगामी सिनेमांसह लग्नसोहळ्याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या