लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
Yo Yo Honey Singh Pune Concert Delayed: यो यो हनी सिंहच्या पुण्यातल्या कॉन्सर्टवर पावसाचं सावट. पुण्यातील शो पुढे ढकलण्यात आला.

Yo Yo Honey Singh Concert Postponed: प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Honey Singh) कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी गाण्यामुळे तर गाण्यातील शब्दांमुळे गायक वादाच्या भोवऱ्यात अडकतो. अलिकडेच हनी सिंहने त्याच्या 'My Story- India Chapter' टूरचे (Music Concert) आयोजन केले होते. 28 मार्च रोजी मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राऊंड्सवर त्याच्या टूरचा पहिला शो पार पडला. हा शो प्रचंड गाजला. मात्र, काही गोष्टींमुळे अडचणीत सापडला. दरम्यान, 4 एप्रिल रोजी त्याच्या टूरचा दौरा पुणे येथे वळणार होता. दरम्यान, हनी सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टवर पावसाचं (Pune Rain) संकट ओढावलं आहे. या कारणामुळे हा शो पुढे ढकलण्यात आला आहे.
पुण्याला अवकाळी पावसानं झोडपलं, हनी सिंहचा कॉन्सर्ट पोस्टपोन
पुण्यात सध्या पावसाचं संकट ओढावलं आहे. 2 एप्रिल रोजी पुण्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. प्राथमिक अंदाजानुसार, अवकाळी पावसामुळे पिकांची प्रचंड नासधूस झालीये. गहू, कांदासह फळांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना तर बसला, तसेच रॅपर यो यो हनी सिंहलाही बसला. अवकाळी पावसाचं थैमान थांबलं जरी असलं तरी, पावसाच्या शक्यतेमुळे हनी सिंहचा होणारा शो पुढे ढकलण्यात आला आहे.
कॉन्सर्टमध्ये मद्य विक्री तसेच असभ्य भाषेवरही बंदी
View this post on Instagram
हनी सिंह याचा लाईव्ह शो 4 एप्रिल रोजी पुण्यात होणार होता. मात्र, पुण्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हा शो पुढे ढकलण्यात आला. आजही पुण्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच खराब हवामानामुळे हनी सिंहने आपला शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, खराब हवामानामुळे पुण्यातील शो पुढे ढकलण्यात आल्यामुळे हनी सिंहचे चाहते काही प्रमाणात नाराज आहेत. आज होणारा पुण्यातील हनी सिंह याचा लाईव्ह शो 18 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून हनी सिंहच्या शोवर काही अटी आणि शर्ती देखील लागू करण्यात आल्या आहेत. मद्य विक्री तसेच असभ्य भाषेवरही बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
हनी सिंहच्या अडचणीत वाढ; इशाऱ्या नंतरही आयोजकांकडून नियम धाब्यावर, गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?





















