एक्स्प्लोर

Why Ranveer Singh Quitted Don 3: रणवीर सिंहनं का सोडला 'डॉन 3'? फरहान अख्तरसोबत नेमकं बिनसलं कुठे? इंडस्ट्रीतल्या वादाची A टू Z माहिती

Why Ranveer Singh Quitted Don 3: रणवीरच्या बेभरवशाच्या वागण्यामुळे 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'नं त्याला बॅन केलं. त्यामुळे आता रणवीर सिंहच्या अडचणींत मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. 

Why Ranveer Singh Quitted Don 3: गेल्या काही दिवसांपासून अचानक सोडलेला 'डॉन 3' (Don 3) आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद यामुळे बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह (Ranveer Singh) चर्चेत आहे. रणवीर सिंह सध्या त्यांच्या 'धुरंधर' (Dhurandhar) फ्रँचायझीच्या अभूतपूर्व यशानंतर 'डॉन 3'मध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, रणवीरनं अचानक माघार घेत अनेकांना बुचकळ्यात पाडलं. त्याच रणवीरच्या अशा या बेभरवशाच्या वागण्यामुळे 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'नं त्याला बॅन केलं. त्यामुळे आता रणवीर सिंहच्या अडचणींत मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. 

दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर (Director-Producer Farhan Akhtar) याच्या 'डॉन 3' सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय रणवीर याच्यासाठी अडचणीचा ठरत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला हा विषय केवळ कलाकार बदलण्यापुरता मर्यादित असल्याचं वाटत होतं, मात्र आता तो कायदेशीर वादाच्या दिशेनं गेल्याचं सांगितलं जात आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, फरहान अख्तर याच्या एक्सेल एंटरटेनमेंटनं रणवीर सिंह याच्याकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याशिवाय 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) नंही रणवीर सिंह याच्याविरोधात नॉन-कोऑपरेशनचा आदेश जारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकं रणवीर सिंहनं 'डॉन 3' का सोडला? आणि त्याच्यात आणि फरहान अख्तर याच्यात नेमका कोणता वाद निर्माण झाला? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

रणवीर सिंहनं 'डॉन 3' का सोडला?

खरं तर ही गोष्टी काही हल्लीहल्लीची नाही, तर ही गोष्ट आहे, 2023 मधली. त्यावेळी 'डॉन' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली. यासोबतच रणवीर सिंह याची या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी, म्हणजेच 'डॉन'च्या भूमिकेसाठी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. यापूर्वी या फ्रँचायझीमध्ये 'डॉन'ची भूमिका अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी साकारली होती.

एवढंच काय तर, 'डॉन 3'मधला रणवीर सिंह याचा पहिला लूक आणि प्रमोशनल व्हिडीओसुद्धा प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र, त्यानंतर विविध कारणांमुळे या सिनेमाच्या निर्मितीत सातत्यानं विलंब होत गेला आणि पुढे या प्रकल्पाभोवती वादाचं सावट निर्माण झालं.
 
रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात नेमकं बिनसलं कुठे?

यानंतर अनेक ऑनलाइन वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की, रणवीर सिंहनं चित्रपट निर्मात्यांसोबत झालेल्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे 'डॉन 3' सोडण्याचा निर्णय घेतला. फ्री प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, रणवीर सिंहला 'डॉन'च्या व्यक्तिरेखेची अधिक गडद, आक्रमक आणि तीव्र आवृत्ती साकारायची होती. या पात्रात अधिक प्रभावी संवाद, कठोर भाषा आणि वाढीव अॅक्शन सीन्सचा समावेश असावा, अशी त्याची इच्छा होती.

दुसरीकडे, दिग्दर्शक फरहान अख्तर 'डॉन' फ्रँचायझीच्या मूळ संकल्पनेशी आणि त्यांच्या मूळ दृष्टीकोनाशी प्रामाणिक राहण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे दोघांमध्ये कथानक आणि पात्राच्या मांडणीबाबत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती.

मिडिया रिपोर्टनुसार, सिनेमाच्या निर्मितीत वारंवार होणारा उशीर आणि फायनल स्क्रिप्ट वेळेत तयार न होणं यामुळेही रणवीर सिंह नाराज होता. या कारणांमुळे त्यानं सिनेमातून माघार घेतल्याचे दावे करण्यात आले. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे, रणवीर सिंहनं 'डॉन 3' सोडण्यामागील कारणांबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे या सर्व चर्चा आणि दावे हे माध्यमांतील अहवालांवर आधारित असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रणवीरनं 'डॉन 3' सोडल्यानंतर फरहानची भूमिका काय?

फरहान अख्तरनं रणवीर सिंहसोबतच्या आपल्या मतभेदांविषयी भाष्य केलेलं. 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, या अभिनेता-दिग्दर्शकानं म्हटलंय की, "मी शिकलेली गोष्ट म्हणजे, अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगणं... जोपर्यंत एखादी गोष्ट प्रत्यक्ष सिनेमात पाहायला मिळत नाही, तोपर्यंत ती गृहीत धरता येत नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranveer Singh Responds After FWICE Ban: रणवीर सिंहला 'डॉन 3' सोडणं महागात; फिल्म वर्कर्सच्या सर्वात मोठ्या संस्थेनं इंडस्ट्रीत घातलीय बंदी, आता म्हणतोय...

ABP माझाच्या बातम्या LIVE...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget