Alia Ranbir Wedding : आलिया- रणबीरच्या लग्नामध्ये 200 बाउन्सर; आलियाच्या भावानं दिली माहिती
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आलियाच्या भावाने म्हणजेच राहुल भटने लग्नामध्ये असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे.
Alia Ranbir Wedding : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रिपोर्टनुसार, 17 एप्रिल रोजी हे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. तसेच या लग्नसोहळ्याच्या तयारीला देखील सुरूवात झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आलियाच्या भावाने म्हणजेच राहुल भटने (Rahul Bhatt) लग्नामध्ये असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे.
मुलाखतीमध्ये राहुल भट यानं सांगितलं आहे की, आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जबाबदारी युसूफ भाई हे पार पाडणार आहेत. मुंबईमधील '9/11' या सुरक्षा व्यवस्थेची एजन्सी ही त्यांचीच आहे. या एजन्सीमधील 200 बाउन्सर लग्नामध्ये सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणार आहेत. 'आरके’ स्टुडिओ परिसरात गार्ड्स तैनात असतील, अशीही माहिती राहुलनं दिली
रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी
आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण दोहर जोया अख्तर, संजय लीला भन्साळी, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा :
- Happy Birthday Rohini Hattangadi : हा तर योगायोगच! पडद्यावर ‘कस्तुरबा’ साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडींचं खऱ्या आयुष्यातही गांधींशी खास कनेक्शन!
- Adipurush : ‘रामनवमी’च्या निमित्ताने दिसला प्रभासचा ‘राम’ अवतार, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने शेअर केला खास व्हिडीओ!
- Ranbir-Alia Wedding Preparations: रणवीर-आलियाच्या लग्नाची लगबग, कपूर घराण्याचा ‘आरके’ स्टुडिओ नववधूप्रमाणे सजला!