एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'महाराज मला शिक्षा देतात, तेव्हा...'; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महाराज ज्याचा शिरच्छेद करतात 'तो' रंगोत्री कुणी साकारलाय?

Ramchandra Gaonkar Shares Experience: अभिनेता आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर याची या ऐतिहासिक सिनेमात 'रंगोत्री' ही महत्त्वाची भूमिका आहे.

Ramchandra Gaonkar Interview Raja Shivaji: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा धगधगता इतिहास 'राजा शिवाजी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. या सिनेमासाठी रितेश देशमुखने विशेष मेहनत घेतली.  त्याने घेतलेले कष्ट, मेहनत या सिनेमाचा ट्रेलर पाहूनच समोर येते.  या सिनेमात रितेश देशमुख व्यतिरिक्त मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडच्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर याचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याचे काही अॅक्शन सीन्स आहेत.  रितेश देशमुखसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? याबाबत त्यानं माहिती दिली. 

रितेश देशमुखसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? (Ramchandra Gaonkar interview Raja Shivaji Film experience)

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गावकरने 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करतानाचा अनुभव शेअर केला. 'या ऐतिहासिक सिनेमात मी अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. रितेश देशमुख सरांसोबत माझ्या काही अॅक्शन सीन्स आहेत. या अॅक्शन सीन्सचं शूटिंग जवळपास 7 दिवस सुरू होतं.   खास अॅक्शन सीक्वेन्ससाठी परदेशातून टीम बोलावण्यात आली होती.    विविध पद्धतीने अॅक्शन सीन्स सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारीत हा सिनेमा असल्यामुळे  परदेशातून आलेल्या अॅक्शन टीमला योग्य प्रकारे याची माहिती देण्यात आली होती'.

या ऐतिहासिक सिनेमात काम करताना कधीही दडपण आलेलं नाही

'रितेश सरांसोबत काम करताना 7 दिवसांत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, रितेश देशमुख सरांचा 'राजा शिवाजी' या सिनेमातील अगदी छोट्यातल्या छोट्या भूमिकांचा  अभ्यास पक्का होता. एवढे मोठे आर्टिस्ट जेव्हा तुमच्या समोर असतात, तेव्हा निश्चितच आव्हानात्मक असतं. परंतु, या सिनेमात काम करताना कधीही दडपण आलेलं नाही', असं रामचंद्र गावकर म्हणाला.

'राजा शिवाजी' सिनेमात रामचंद्र गावकर कोणत्या भूमिकेत दिसणार? (Ramchandra Gaonkar as Rangotri)

''राजा  शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात मी रंगोत्री हे  पात्र  साकारत आहे.  या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर आपण पाहिलाच असेल.  या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मला शिक्षा देतात. मला महाराज शिक्षा का देतात? शिक्षा देण्यासारखा मी कोणता मोठा गुन्हा करतो?   हे सगळं तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल'. 

रितेश सरांबाबतीत भावलेली गोष्ट कोणती? (Riteish Deshmukh as Chhatrapati Shivaji Maharaj)

'सिनेमाच्या सेटवर रितेश सर नेहमी सर्वांशी आदराने बोलत होते.  मी एक अभिनेता असण्यासोबत एक दिग्दर्शकही आहे.  माझ्या सिनेमाचं शूटिंगही तेव्हा सुरू होतं.  मी पहिल्यांदा जेव्हा रितेश सरांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली. जेव्हा एवढा मोठा अभिनेता आणि दिग्दर्शक माझ्यासारख्या नवोदित दिग्दर्शकाला चित्रपटाबद्दल विचारतो, तेव्हा ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ही बाब अविस्मरणीय आहे', असंही रामचंद्र गावकर म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहरुखचा लेक आर्यन खानचा मित्राच्या लग्नात राडा, बूट पळवताना झटापट VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget