Mahesh Limaye on Ashok Saraf: 'शुटिंगच्या 5 दिवस आधी अशोक मामा ICUमध्ये होते, तरीही'; महेश लिमयेंनी सांगितला किस्सा, पायाला झालेली दुखापत अन्...
Mahesh Limaye on Ashok Saraf: अशोक सराफ यांच्याबद्दल महेश लिमये नेमकं काय म्हणाले?

Mahesh Limaye on Ashok Saraf Shooting: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्यांचा 'आदि अनंत' (Aadi Anant) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या सिनेमातून अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अशोक सराफ यांनी आपल्या आयुष्यात अनेक माणसं जोडली आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात कायम कामाला प्राधान्य दिलं आहे. याच संदर्भातील एक किस्सा दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये (Mahesh Limaye) यांनी सांगितला आहे.
दिग्दर्शक महेश लिमयेंनी सांगितला अशोक सराफ यांच्यासोबतची एक आठवण (Ashok Saraf Returned to Shooting Days After ICU)
महेश लिमये यांनी अलिकडेच 'The Marathi Founder'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से शेअर केले आहेत. अशोक सराफ यांच्यासोबतचा एक किस्सा महेश लिमये यांनी पॉडकास्टमध्ये शेअर केला. महेश लिमये म्हणाले की, 'अशोक मामा एक सीन शूट करत होते. त्यांच्या पायाला लागलं होतं. असं वाटलं आता पॅकअप होईल. अर्ध्या तासात पायाला बॅण्डेज वगैरे बांधून, म्हणाले की, चला शूटिंग करुयात म्हणाले. ते जेवढे धमाल - मस्ती करतात. तेवढेच आतून खूप हळवे आहेत'.
View this post on Instagram
'त्यांना मी सांगायचो की, मामा हा जरा सूर लागत नाहीये. ते म्हणायचे की, हो थांब थांब मी ट्राय करतो. मग ते गरम पाणी पिणार. परत हवा तसा टेक देणार', असं महेश लिमये म्हणाले. 'अशोक मामा जेव्हा शूटिंग आले, तेव्हा ते 5 दिवस आधी ICUमध्ये होते. ICU मध्ये असताना अशोक सराफ म्हणाले की, 'थांबा कॅन्सल नका करु, हवं तर पोस्टपोन करा'. मग मी तोपर्यंत त्यांच्याशिवाय असलेले काही सीन्स शूट केले. ते आल्यानंतर पुन्हा काही रिक्रिएट केले सीन्स. पण ICUमधून बाहेर आल्यावर सातव्या ते आठव्या दिवशी माणूस सेटवर येऊन काम करतो, ते पण 9-10 तास. अशावेळी वेदना घेऊन परफॉर्म करणं, हे सोपं नाही. ज्याप्रकारे त्यांनी परफॉर्म केलं आहे, त्यांना खरंच सॅल्यूट आहे', असं महेश लिमये म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















