(Source: ECI | ABP NEWS)
Bollywood Muslim Actress Chant Hanuman Chalisa: 'मी आध्यात्मिक, धार्मिक नाही', हनुमान चालीसामुळे 'या' मुस्लिम अभिनेत्रीला मिळते शांती, वर्षातून 9 दिवस ठेवते उपवास
Bollywood Muslim Actress Chant Hanuman Chalisa: बॉलिवूडची मुस्लिम अभिनेत्री जिला हनुमान चालिसाचं पठण करुन, गायत्री मंत्राचा जाप करुन आनंद मिळतो. तुम्ही ओळखता का?

Bollywood Muslim Actress Chant Hanuman Chalisa And Gayatri Mantra: बॉलिवूड इंडस्ट्रीत (Bollywood Industry) अनेक सिनेकलाकार वेगवेगळ्या धर्मांचे, प्रांतांचे आहेत. बॉलिवूडचे (Bollywood News) तिन्ही खान्स मुस्लिम आहेत. तसेच, ते इतर धर्मांचा आदर करतात. सलमान खान (Salman Khan) मुस्लिम असूनही गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणरायाची मनोभावे स्थापना करतो. यासाठी त्याच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षावही केला जातो. पण, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींबाबत सांगत आहोत, जी मुस्लिम कुटुंबातील आहे, पण भारतात राहत नाही. ती हनुमान चालीसाचं पठण करते. याबद्दल ती म्हणते की, तिला यातून शांती मिळते. इतकंच नाहीतर ती गायत्री मंत्राचा जापही करते. जर तुम्हाला वाटत असेल की, तिनं यासाठी तिचा धर्म सोडला, तर तसं अजिबात नाही. मुस्लिम असूनही ती या सर्व गोष्टी करते.
ती बॉलिवूडमध्ये रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) 'रॉकस्टार' सारख्या चित्रपटांचा भाग राहिली आहे. याशिवाय तिनं अनेक चित्रपट केले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला धक्का बसला असेल तर आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल सांगतो. खरं तर, मुस्लिम कुटुंबातून येऊनही हिंदू पूजापाठावर विश्वास ठेवणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) आहे, जिच्या वडिलांचं नाव मोहम्मद फाखरी आहे आणि ती पाकिस्तानची आहे. अभिनेत्रीची आई मेरी फाखरी आहे. जेव्हा नर्गिस 6 वर्षांची होती, तेव्हा तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तिची आई अमेरिकेची रहिवासी असल्यानं आणि नर्गिसचा जन्मही तिथेच झाला आणि जन्मानंतर ती अमेरिकन झाली. तिनं स्वतः 'ग्लोबल सिटिजन' असल्याचं सांगितलं आहे.
नर्गिस फाखरीनं News9 Live शी बोलताना स्वतःला धार्मिक नाहीतर अध्यात्मिक असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, तिला सर्व धर्मांबाबत जाणून घ्यायला आवडतं. तिच्या घरात गायत्री मंत्राचं पठण केलं जात असल्याचंही तिनं सांगितलेलं. नर्गिसनं सांगितलेलं की, मंत्रोच्चार, हनुमान चालिसा पठण याची एनर्दी ती फील करते आणि यामुळे तिला चांगलं वाटतं. अभिनेत्री ख्रिश्चन म्युझिकही ऐकते.
वर्षातून 9 दिवसाचं व्रत आणि हनुमान चालिसाचं पठण
एवढंच नाही तर, नर्गिस फाखरीनं हूटरफ्लायशी झालेल्या संभाषणात सोहा अली खानला सांगितलं की, ती वर्षातून दोनदा 9 दिवसांचा उपवास देखील करते. यामध्ये ती काहीही खात नाही आणि फक्त पाणी पिते. ती म्हणते की, हे खूप कठीण आहे, पण तिला ते आवडतं. तिनं हेच तिच्या सौंदर्याचं रहस्य असल्याचं सांगितलं. यासोबतच, अभिनेत्रीनं फिल्मफेअरला सांगितलं की, जेव्हा ती तणावात असते, तेव्हा ती हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्रांचा जप करते. तिचा असा विश्वास आहे की, यामुळे तिचा ताण कमी होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























